शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पॉलिटीकल ट्विस्ट; छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदावर भाजपचा दावा

By विकास राऊत | Updated: June 13, 2024 19:31 IST

छत्रपती संभाजीनगर पॉलिटीकल ट्विस्ट;  शिंदेसेना की भाजप, असा पेच निर्माण होतोय

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून संदीपान भुमरे हे निवडून गेले आहेत. त्यामुळे पालकमंत्री पद रिक्त होणार आहे. हे पद रिक्त होणार असल्यामुळे शिंदेसेनेत मंत्री आणि पालकमंत्री होण्यासाठी स्पर्धा लागलेली असतानाच आता भाजपनेदेखील या स्पर्धेत उडी घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत भुमरे यांना निवडून आणण्यासाठी भाजपने जिवाचे रान केले. त्यामुळे पालकमंत्रीपदी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांना संधी मिळावी, अशी मागणी भाजपच्या गोटातून पुढे आली आहे. यासाठी दोन दिवसांत भाजपचे जम्बो शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटून ही मागणी करणार असल्याचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी मंगळवारी सांगितले. यावेळी गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, सरचिटणीस लक्ष्मीकांत थेटे, जालिंदर शेंडगे यांची उपस्थिती होती.

बोराळकर यांनी सांगितले, भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्रीपद पक्षाला मिळावे, अशी मागणी सुरू केली आहे. पालकमंत्री पद रिक्त होत असून, ते गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांना देण्यात यावे. सावे यांच्यासारख्या व्यक्तीकडे हे पद गेले, तर सर्वांना सोबत घेऊन चालतील. येणाऱ्या विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका समोर ठेवल्यास सावे हे सर्व पातळीवर न्याय देऊ शकतात. पालकमंत्री पद सावे यांना मिळावे, यासाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे मागणी केली जाणार आहे. दरम्यान साडेतीन महिन्यांवर विधानसभा निवडणुका आहेत, त्यामुळे स्पर्धा आणि वाद होण्यापेक्षा एखाद्या मंत्र्याकडे या जिल्ह्याचे प्रभारी पालकमंत्रीपदही दिले जाऊ शकते, अशीही चर्चा सुरू आहे.

शिरसाट, सत्तार इच्छुक....जिल्ह्याचे पालकमंत्री भुमरे हे खासदार झाल्यामुळे त्यांचे रोहयो, फलोत्पादन खाते व पालकमंत्रीपदही रिक्त होणार आहे. त्या पदावर वर्णी लागावी, यासाठी शिंदेसेनेअंतर्गत जोरदार स्पर्धा लागली आहे. सिल्लोडचे आ. अब्दुल सत्तार यांनी राजकीय हादरे बसतील, असे वक्तव्य करून दबावतंत्र वाढविण्यास सुरुवात केली आहे. तर, भुमरे यांना पश्चिम मतदारसंघातून सर्वाधिक जास्त मताधिक्य देऊन आ. संजय शिरसाट हे मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रीपद मिळण्यासह पालकमंत्रीपदाचे दावेदार असल्याचे बोलले जात आहे. त्यातच आता भाजपने आपला पत्ता फेकत पालकमंत्रीपदासाठी दावा केला आहे.

मीच घेऊन जातो शिंदेंकडे....भाजपने अपरंपार मेहनत घेऊन शिंदेसेनेचा उमेदवार लोकसभेला निवडून आणला. त्यामुळे त्यांनी केलेली मागणी चांगली आहे. त्यांना आवश्यकता असेल, तर मीदेखील त्यांच्या सोबत मुख्यमंत्र्यांना भेटेल व पालकमंत्री पद भाजपला द्या असे सांगेन.- संजय शिरसाट, आमदार

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादAtul Saveअतुल सावेSanjay Shirsatसंजय शिरसाटAbdul Sattarअब्दुल सत्तार