शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

शिवसेनेच्या ४ लोकसभा सीटवर भाजपचा दावा, मंत्री कराडही मैदानात उतरणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 09:51 IST

भागवत कराड यांनीही औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे.

औरंगाबाद - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची सोमवारी (दि. २ जानेवारी) मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सायंकाळी ५.३० वाजता सभा होणार असून, भाजप लोकसभा निवडणुकीचे रणशिंग औरंगाबादेतून फुंकणार आहे. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, सहकार मंत्री अतुल सावे यांच्यासह प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळेंसह भाजपचे वरिष्ठ नेते हजर असणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि केंद्रीयमंत्री भागवत कराड यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिवसेनेच्या ४ जागांवर दावा केला आहे. 

भागवत कराड यांनीही औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. मी पक्षाचा कार्यकर्ता असून पक्षाने आदेश दिल्यास मी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं ते म्हणाले. तसेच, औरंगाबाद, परभणी, हिंगोली आणि उस्मानाबाद या चारही जागांवर भाजपचा दावा केला आहे. शिवसेनेत मोठी बंडखोरी झाल्यानंतर शिवसेनेचे १३ खासदार शिंदे गटात दाखल झाले आहेत. तर, इतर खासदार आजही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहेत. त्यामध्ये, परभणीचे खासदार बंडू जाधव आणि उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर हे ठाकरेंसोबत आहेत. त्यामुळे, या दोन्ही जागांवर भाजपने निवडणुकीसाठी दावा केला आहे. तर, औरंगाबाद येथील जागेवर सध्या एमआयएमचे खासदार आहेत. त्यामुळे, या तीन आणि हिंगोलीच्या जागांवर सध्या भाजपने लक्ष केंद्रीत केल्याचे भागवत कराड यांनी सांगितले.   

भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू आहे. त्यातच, महाराष्ट्र हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचं लोकसभा सदस्य असलेलं राज्य आहे. त्यामुळे, भाजपचं महाराष्ट्रावर विशेष लक्ष आहे. देशातील १४४ लोकसभा मतदारसंघांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. राज्यात शिवसेनेकडे असलेल्या १८ जागांसाठी भाजप व्यूहरचना आखत आहे. देशात भाजपने ४०० जागा लढविण्याचा निश्चय केला आहे. त्याचे नियोजन म्हणून अनेक केंद्रीय मंत्र्यांना विविध लोकसभा मतदारसंघ संघटनात्मक मजबुतीसाठी वाटून दिले आहेत. मराठवाड्यात औरंगाबादसह, हिंगोली, परभणी आणि उस्मानाबाद लोकसभा लढवण्यासाठी भाजप पूर्णपणे संघटनात्मक तयारी करीत आहे. 

नड्डांच्या सभेला सहा मतदारसंघातील पदाधिकारी

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ भाजप लढणार असून, सभेला सहा विधानसभेतील पदाधिकारी, कार्यकर्ते, भाजपप्रेमी, नागरिक उपस्थित राहतील, अशा व्यवस्था केली आहे. रविवारी सायंकाळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड, सहकार मंत्री सावे, शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी सभास्थळाची पाहणी करीत तयारीचा आढावा घेतला

असा असेल नड्डांचा दौरा 

अध्यक्ष नड्डा २ जानेवारी रोजी घृष्णेश्वर मंदिरात दर्शनाला जातील. त्यांच्या हस्ते वेरूळ येथील अहिल्यादेवी कुंडाच्या सौंदर्यीकरणाचा व साउंड व लाईट शोच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे. तेथून ते सभेसाठी शहरात येतील. सभेनंतर वैजापूर, कन्नड, गंगापूर व शहरातील तीन अशा सहा मतदारसंघांतील भाजप कोअर कमिटीची ते बैठक घेतील. नंतर शहरातील महत्त्वाच्या नागरिकांशी ते चर्चा करणार आहेत. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाBhagwat Karadडॉ. भागवत