शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भाजपवाले दंगल संपल्यानंतर हजर झाले - चंद्रकांत खैरे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 19:40 IST

११ व १२ मे रोजी झालेल्या दंगलीमध्ये हिंदूंना वाचविण्याचे काम शिवसैनिकांनी केले. शनिवारी सकाळी पोलिसांची अधिक कुमक दाखल झाल्यानंतर भाजपचे आमदार अतुल सावे घटनास्थळी आले.

ठळक मुद्देशिवसेनेतर्फे तापडिया नाट्यमंदिर येथे शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख यांच्या बैठकीचे आयोजन बुधवारी (दि.१६) केले होते. त्यात बोलताना खा. खैरे यांनी अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केले.

औरंगाबाद : ११ व १२ मे रोजी झालेल्या दंगलीमध्ये हिंदूंना वाचविण्याचे काम शिवसैनिकांनी केले. शनिवारी सकाळी पोलिसांची अधिक कुमक दाखल झाल्यानंतर भाजपचे आमदार अतुल सावे घटनास्थळी आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भय्याजी जोशी यांनी एका महिलेकडून दंगलीचा आढावा घेतला. तेव्हा त्यांना शिवसैनिकांनी शहर वाचविल्याचे त्या महिलेने सांगितले. यानंतर जोशी यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना झापल्यानंतर त्यांनी दोन दिवसांनी दंगलग्रस्त भागाची पाहणी केल्याचा गौप्यस्फोट शिवसेना नेते खा. चंद्रकांत खैरे यांनी केला.

शिवसेनेतर्फे तापडिया नाट्यमंदिर येथे शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख यांच्या बैठकीचे आयोजन बुधवारी (दि.१६) केले होते. त्यात बोलताना खा. खैरे यांनी अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केले. यावेळी संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, सहसंपर्कप्रमुख अण्णासाहेब माने, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, महापौर नंदकुमार घोडेले, आमदार संजय शिरसाट, शहरप्रमुख राजू वैद्य, बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते.

यावेळी खा. खैरे म्हणाले, शहरातील दंगलीसंदर्भात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आरोप करीत आहेत. मुळात हेच विखे मुख्यमंत्र्यांशी मिळालेले आहेत. त्यांच्या आरोपांकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही. भाजप महापालिकेत, राज्यात सत्तेत आहे. तरीही त्यांचे शहरातील कचरा, पाणीप्रश्नी कोणीही नाव घेत नाही. उलट हे भाजपवालेच शिवसेनेला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचत असल्याचा आरोप खा. खैरे यांनी केला. 

शहरातील हिंदू नागरिकांचे रक्षण करण्यास शिवसेना हा एकमेव पक्ष सक्षम असल्याचा दावाही त्यांनी केला. विनोद घोसाळकर म्हणाले, शिवसेना स्वबळावर लढणार असल्यामुळे शाखाप्रमुखांनी आताच कामाला लागावे. ज्यांना काम करायचे आहे त्यांनीच स्वत:कडे पदे ठेवावीत. अन्यथा पदे सोडून देऊन दुसऱ्यांना काम करण्याची संधी देण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी आ. शिरसाट, नरेंद्र त्रिवेदी, प्रदीप जैस्वाल आदींनी मनोगत व्यक्त केले.

...तर पुन्हा दंगलीचा भडका उडेलशहरात घडलेल्या दंगलीत लच्छू पहिलवान यांना नागरिकांनी बोलावले. त्यांनी हिंदूंना मदत केली. आता त्यांना जर कोणी हात लावण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा शहरात दंगलीचा भडका उडेल, असा इशारा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी दिला. तसेच हिंदंूच्या रक्षणासाठी आगामी आठवड्यात क्रांतीचौक ते शहागंज, चेलीपुरामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणाही दानवे यांनी केली.

जंजाळने माझ्या पुतण्याला वाचवलेदंगलीमध्ये एका जैन महिलेला वाचविण्यासाठी माझा पुतण्या सचिन खैरे, प्रदीप जैस्वाल यांचा मुलगा ऋषिकेश जैस्वाल, लच्छू पहिलवानचा मुलगा गेले होते. त्या घरावर दगडफेक करण्यात येत होती. या महिलेसह चौघांना वाचविण्यासाठी राजू जंजाळने हवेत काय करायचे ते केले. (यावेळी गोळीबाराचा उल्लेख टाळत बोटाने इशारा केला.) राजूने असे केले नसते तर त्या चौघांचा बळी गेला असता, असा दावाही खा. खैरे यांनी केला.

टॅग्स :Aurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारChandrakant Khaireचंद्रकांत खैरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा