शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

भाजप मुख्यमंत्र्यांना ‘जय श्रीराम’ नावाची २५ हजार पत्रे पाठवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 17:34 IST

५ आॅगस्ट रोजी शहरातील विविध भागांत  आरती करणाऱ्या रामभक्तांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ठळक मुद्दे भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केल्याचा निषेध

औरंगाबाद : अयोध्येत ५ आॅगस्ट रोजी श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजनाच्या दिवशी शहरात विविध ठिकाणी भाजपतर्फे श्री रामाची आरती करण्यात आली होती.  त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. 

या घटनेच्या निषेधार्थ औरंगाबाद भाजपच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ‘जय श्रीराम’ असे शब्द लिहिलेली २५ हजार पत्रे पाठविण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी दिली. भाजपतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, ५ आॅगस्ट रोजी शहरातील विविध भागांत  आरती करणाऱ्या रामभक्तांवर गुन्हे दाखल करण्यात आले. याचा निषेध म्हणून ही पत्रे आणि मेल पाठविण्यात येणार आहेत. अभियानाच्या प्रमुखपदी प्रमोद राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर खासदार डॉ. भागवत कराड, आ. अतुल सावे, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, माजी महापौर बापू घडामोडे हे मार्गदर्शक आहेत. 

पत्रातील मजकूर ५ आॅगस्टला आम्ही प्रभू श्रीरामाची आरती केली. पूजन केले व श्रीरामाचा जयघोष पण केला. आपल्या दृष्टिकोनातून हा जर गुन्हा असेल, तर आमच्यावरही हा गुन्हा नोंदवला जावा, ही विनंती केली जाणार असल्याचेही संजय केणेकर यांनी सांगितले. या प्रसिद्धीपत्रकावर डॉ. राम बुधवंत यांची स्वाक्षरी आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाAyodhyaअयोध्याAurangabadऔरंगाबाद