शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

ना शिंदे ना ठाकरे सेनेसोबत युती; भाजप महापालिका निवडणुका स्वबळावरच लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 16:41 IST

‘युती होणार, ठाकरे गटाशीही जुळवून घेणार‘, यासारख्या चर्चेमुळे भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते अस्वस्थ आहेत.

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदेसेनेची युती होणार, असे शिंदेसेनेचे नेते ठामपणे सांगत असले तरी शिंदेसेनेशी युती होणार नाही, असे भाजपने मंगळवारी स्पष्ट केले.

मुंबईतील प्रदेश कार्यालयात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येणाऱ्या पालिका निवडणुकीत भाजपचा महापौर बसविण्यासाठी प्रयत्न करावा, अशा सूचना स्थानिक नेत्यांना दिल्या. भाजपची शहरामध्ये ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. येणाऱ्या काळात विविध पक्षांतील अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा यावेळी स्थानिक नेत्यांनी केला.

दरम्यान आ. रवींद्र चव्हाण, आ. चंद्रशेखर गरजे, राज्यसभा खा. डॉ. भागवत कराड, ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे, शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्या उपस्थितीत रिपाइंचे माजी नगरसेवक कैलास गायकवाड, रमेश जायभाय यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजप कार्यकर्ते अस्वस्थ...‘युती होणार, ठाकरे गटाशीही जुळवून घेणार‘, यासारख्या चर्चेमुळे भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. २०१९ पासून आजपर्यंत कार्यकर्त्यांनी ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी सामना केला. शिंदेसेना सोबत आल्यानंतर सत्ता मिळाली, पण त्यात कार्यकर्त्यांचे काही भले झाले नाही. मंत्री, नेत्यांच्या मागे-मागे फिरणाऱ्यांचे अडीच वर्षांत कल्याण झाले. राष्ट्रवादीचा एक गट महायुतीत आल्यानंतरही कार्यकर्त्यांचे मनोबल खचले. आता सत्ता आल्यामुळे काही भले होईल, या अपेक्षेत कार्यकर्ते असतानाच ठाकरेंशी हातमिळवणीची चर्चा, नवीन पक्षप्रवेशांमुळे ते पुन्हा खचले आहेत. पक्ष प्रत्येक कार्यक्रम ‘टार्गेट’ देऊन पूर्ण करून घेतो, मात्र त्या तुलनेत कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना ‘आउटपूट’ मिळत नसल्याची भावना अनेकांनी बोलवून दाखविली.

मनपात एकहाती सत्ता आणूयेणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका भाजपला स्वबळावर लढायच्या आहेत. मनपा निवडणूक स्वबळावर लढविणार असून, एक नंबरचा पक्ष म्हणून सगळ्यात जास्त नगरसेवक भाजप निवडून आणेल, त्यासाठी नियोजन सुरू आहे. भाजपच्या चिन्हावर निवडून आलेला नगरसेवकच महापौर बनेल. मनपात एकहाती सत्ता आणणार आहोत. कुणाशीही आमची युती होणार नाही. शिंदेंसोबत युती होणार नाहीच, शिवाय ठाकरे गटाशी तर संबंधच राहिलेला नाही. कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.- शिरीष बोराळकर, भाजप शहराध्यक्ष

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरBJPभाजपाMuncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूक 2024Shiv Senaशिवसेना