शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित ठेवण्याचा डाव; शिवसेनेचा भाजपवर गंभीर आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 17:51 IST

राज्यासह केंद्रातील भाजपा सरकारने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित ठेवण्याचा डाव आखला असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेतर्फे करण्यात आला.

ठळक मुद्देसरकारने चार वर्षात घोषीत केलेल्या ६५० योजनांची शिवसेना चिरफाड करणार

औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आॅनलाईन सातबारा देणे बंद केले आहे. तलाठी शेतकऱ्यांना आॅफलाईनही सातबारा देत नाहीत. याचा फटका शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी तयार कराव्या लागणाऱ्या फाईलला बसत आहे. राज्यासह केंद्रातील भाजपा सरकारने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित ठेवण्याचा डाव आखला असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेतर्फे करण्यात आला. चार वर्षात सरकारने ६५० योजनांची घोषणा केली. मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नसल्यामुळे त्याची चिरफाड करण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.

शिवसेनेतर्फे शेतकऱ्यांची कर्जमाफी, पिककर्ज, स्टॅडप इंडिया, मुद्रा लोण या बँकांशी निगडीत असलेल्या योजनातील सत्य माहिती समोर आणण्यासाठी जिल्ह्याची लिड बँक असलेल्या बँक आॅफ महाराष्ट्रच्या सिडकोतील विभागीय कार्यालयासमोर आज (दि.९) ‘सत्याशोधन आंदोलन’ करण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी फसव्या सरकारच्या घोषणांविरोधात निदर्शने केली. भाजप सरकारला शिव्यांची लाखोली वाहण्यात आली. तसेच कर्जमाफी, पिक कर्जाचे वाटप, मुद्रा लोन अशा विविध सरकारी योजनाची आकडेवारी मांडण्याची आग्रही मागणी केली. 

यावेळी घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. शेवटी बँकच्या विभागीय अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना सामोरे जात आकडेवारीसह वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही आकडेवारी सादर करत अधिकाऱ्यांना उघडे पाडले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, अनिल पोलकर, संतोष जेजुरकर, राजु राठोड, बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, गणेश चोपडे, राजू वैद्य, विश्वनाथ स्वामी, सचिन खैरे, रंजना कुलकर्णी, राजेंद्र दानवे आदींसह शेकडो पदाधिकारी उपस्थितीत होते.

कर्जमाफीच्या फसव्या योजनेचा निषेधराज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती. मात्र ही योजनाच फसवी असल्याचे दिसून आले आहे. योजनेला सुरुवात होऊन वर्ष झाले आहे. यात ३ लाख ३६ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. यातील १ लाख ४२ हजार शेतकऱ्यांना कोणताही लाभ मिळालेला नसल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला. सरकारने चार वर्षात घोषीत केलेल्या ६५० योजनांची शिवसेना अशीच चिरफाड करणार असल्याचेही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाagitationआंदोलनFarmerशेतकरीState Governmentराज्य सरकार