शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

भाजपत प्रचंड त्रास; खडसे सोडून गेले तरी वरिष्ठांना काही समजेना

By सुमेध उघडे | Updated: November 18, 2020 19:31 IST

हरलेल्या उमेदवारास पदवीधर कसे मतदान करतील

ठळक मुद्देपदवीधर मतदार संघात एकदा हरलेल्यास पुन्हा उमेदवारीभाजपचा 'तो' उमेदवार वार्डामध्ये ही निवडून येणार नाही

खुलताबाद : भाजपने मराठवाडा पदवीधर मतदार संघात गेल्या निवडणुकीत हरलेल्या उमेदवारालाच परत उभे केले आहे. हा उमेदवार वार्डात निवडून येऊ शकत नाही. अशा हरलेल्या उमेदवारास पदवीधर कसे मतदान करतील अशी टीका माजी खा. जयसिंगराव गायकवाड यांनी केली. तसेच भाजपत प्रचंड त्रास आहे. खडसे पक्ष सोडून गेले तरी वरिष्ठांना काही कळत नाही असा टोलाही त्यांनी यावेळी भाजपला लगावला. ते खुलताबाद येथे पदवीधरांच्या मेळाव्यात बोलत होते. 

माजी.खा. जयसिंगराव गायकवाड यांनी पदवीधर निवडणुकीच्या तिकीट वाटपावरुण नुकतीच भाजपला सोडचिठी दिली. नाराज गायकवाड यांनी यानंतर राष्ट्रवादीचे उमदेवार सतीश चव्हाण यांचा प्रचार करणार असल्याचे जाहीर केले होते. यामुळे पदवीधरांच्या मेळाव्यात ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष होते. अपेक्षेप्रमाणे गायकवाड यांनी मेळाव्यात भाजपवर चौफेर टीका केली. गायकवाड म्हणाले, भाजपमध्ये केवळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे गेलो होतो. एकनाथ खडसे यांनी भाजप सोडली तरी वरिष्ठांना काही समजेना, तिथे प्रचंड त्रास आहे. या निवडणकीत भाजपला अशी चपराक द्या की वरिष्ठांचे पण डोके ठिकाणावर आले पाहिजे अशी टीका करत गायकवाड यांनी भाजपच्या उमेदवाराला चारीमुंड्या चित करायचे असल्याने मराठवाडा दौऱ्यावर निघालो आहे असेही सांगितले.   

यावेळी माजी नगराध्यक्ष अँड. कैसरोद्दीन, माजी सभापती महेश उबाळे, प्रा .गणी पटेल, राष्ट्रवादी कॉग्रेंसचे तालुकाध्यक्ष अनिल चव्हाण, शहराध्यक्ष मुजीबोद्दीन, शहर कार्याध्यक्ष रावसाहेब फुलारे, रायुकॉ तालुकाध्यक्ष आदीनाथ सांळुके, शहराध्यक्ष गजानन फुलारे, निसार पठाण, जिल्हाउपाध्यक्ष केशव जाधव, द्यानेश्वर दुधारे, अब्दूल अजीज, महमंद नईम, अब्दूल मजीद मणियार, पोपट बारगळ आदीसह मोठ्या संख्येने पदवीधर मतदार उपस्थित होते. 

टॅग्स :BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसMarathwadaमराठवाडा