शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे विसरले शहराचे नामकरण; पत्रावर 'औरंगाबाद' उल्लेख

By विकास राऊत | Updated: March 2, 2023 16:13 IST

प्रदेशाध्यक्षच शहराचे बदललेले नाव विसरल्याने पक्षात कुजबूज सुरू झाली;त्यानंतर तातडीने बदलले पत्र

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, देवळाली, देहू, शिवाजीनगर, पुणे येथील  छावणी परिषदेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. त्यासाठी निवडणुक प्रमुख पदासाठी भाजपने काही पदाधिकार्यांनी जबाबदारी देत त्यांच्या नियुक्तीची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांनी केली. त्या नियुक्ती पत्रात छत्रपती संभाजीनगर ऐवजी शहराचे नाव औरंगाबाद असे मुद्रीत होऊन आल्यामुळे गुरूवारी एकच गदारोळ उडाला. 

प्रदेशाध्यक्षच शहराचे बदललेले नाव विसरल्याने पक्षात कुजबूज सुरू झाली. भाजपच्या स्थानिक पदाधिकार्यांच्या लक्षात येताच, त्यांनी प्रदेश कार्यालयाकडून नियुक्तीपत्र बदलण्यासाठी फोनाफोनी सुरू केली. दुपारपर्यंत दुसरे नियुक्तीपत्र भाजप प्रदेश कार्यालयाकडून आल्याचे भाजप सुत्रांनी लोकमतशी बोलतांना सांगितले. दरम्यान प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी देखील त्यांच्या सोशल मीडियातील हँडलवर नवीन पत्र व्हायरल केले. 

यांच्यावर दिली आहे जबाबदारी...पुणे छावणी परिषदेसाठी आ.सुनील कांबळे, शिवाजीनगर आ.सिध्दार्थ शिरोळे, देहू संजय भेगडे, देवळाली बाळासाहेब सानप, अहमदनगर महेंद्र गंधे,  छत्रपती संभाजीनगर संजय केणेकर, नागपूर डॉ.राजीव पोतदार यांच्यावर राज्यातील छावणी परिषदेच्या निवडणुक प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी जारी केलेल्या पत्रात नमूद आहे.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाAurangabadऔरंगाबाद