शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपवाल्यांनी नाक रगडून माफी मागावी, अन्यथा जनता टकमक टोकावर नेईल: अंबादास दानवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 16:56 IST

दिल्ली दरबारी भाजप नेत्यांनी शिवाजी महाराजांच्या बदनामीचा विडा उचलला

औरंगाबाद: अफझल खानाने शिवाजी महाराजांच्या विरोधात ज्या प्रकारे विजापूरच्या दरबारात विडा उचलला होता, त्याच प्रमाणे भाजप नेत्यांनी दिल्ली दरबारी शिवाजी महाराजांच्या बदनामीचा विडा उचलला असल्याचे दिसते, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली. तसेच राज्यातील जनतेसमोर भाजपच्या सर्वांनी नाक रगडून माफी मागावी अन्यथा जनता यांना टकमक टोकावर नेईल, असा इशारा देखील आ. दानवे यांनी दिला. 

आ. दानवे पुढे म्हणाले, केवळ राज्यपाल यांनी एकट्यानीच वक्तव्य केले नाही. भाजपाच्या वेगवेगळ्या नेत्यांनी वक्तव्य केले आहे. एक त्रिवेदी प्रवक्ता आहेत त्यांनी केले, इथे लाड हे बोले, एक केंद्रीय मंत्री आहेत ते बोलले. या सगळ्या लोकांनी दिल्ली दरबारात छत्रपती शिवरायांच्या बदनामीचा विडा उचलल्याचे दिसत आहे. असे तर छत्रपती शिवाजी महाराजांना काही करता येत नाही. यामुळे भाजपाने हा विडा उचलला आहे. अफझल खानाने विजापूर दरबारात शिवाजी महाराजांच्या विरोधात विडा उचलला होता या घटनेशी आ. दानवे यांनी सातत्याने शिवाजी महाराजांची होत असलेल्या बदनामीच्या घटनांची तुलना करत भाजपवर हल्लाबोल केला. या प्रवृत्तीच्या विरोधात मोर्चा आहे. यांना धडा शिकवण्यासाठी हा मोर्चा असेल. येथून गेलेले उद्योगधंदे, महिलांचा अवमान असे विषय घेऊन आमचा मोर्चा निघणार आहे, असेही दानवे यांनी स्पष्ट केले. 

नाक घासून माफी मागावी, अन्यथा टकमक टोकछत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी ठरवून होत आहे. महाराजांच्या विरोधातील वक्तव्य विषारी असून ठरवून केलेली आहेत. सहज झालेले नाही, हे ठरवून झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला हे राज्यातील लहान मुलांना देखील माहिती आहे. हे कुठे झाल्याचे सांगत आहेत? या सर्वांनी महाराष्ट्राच्या जनेतसमोर मातीत नाक रगडून माफी मागायला हवी. तेव्हा जनता त्यांना माफ करेल. रायगडावर, शिवतीर्थावर किंवा शिवनेरी जाऊन नाक रगडावे अन्यथा जनता यांना टकमक टोकावर नेईन असा इशारा देखील आ. दानवे यांनी दिला. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAmbadas Danweyअंबादास दानवेShiv Senaशिवसेना