शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्रिपदासाठी भाजप, शिंदे सेनेत रस्सीखेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 19:18 IST

शिंदे गटाऐवजी भाजपला मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे पालकमंत्रिपद हवे असल्याचे बोलले जात आहे.

औरंगाबाद : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्ह्याला सहकार, कृषी, रोहयो ही खाते मिळाली आहेत. जिल्ह्यास मंत्रिपदे मिळाली; पण आता भाजप आणि शिंदे सेनेत पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. पालकमंत्री भाजप की शिंदे गटाचा, याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे सांगून भाजपने सध्या तोंडावर बोट ठेवले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर केले. यात सहकार व इतर मागास-बहुजन कल्याण खाते आ. अतुल सावे यांना मिळाले. ते २०१९ साली सहा महिन्यांसाठी उद्योग राज्यमंत्री होते. आ. संदीपान भुमरे यांना गेल्या सरकारच्या काळात असलेले रोहयो व फलोत्पादन हे खाते मिळाले आहे, तर आ. अब्दुल सत्तार यांना कृषिखाते मिळाले आहे. यापैकी आ. भुमरे यांनी स्वातंत्र्यदिनी औरंगाबादमध्ये मुख्य ध्वजारोहण केले. सत्तार यांनी जालन्यात, तर सावे यांनी परभणीत ध्वजारोहण केले. या प्रकारामुळे ज्यांनी ध्वजारोहण केले, तेच त्या जिल्ह्याचे पालकमंत्री होतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.

मात्र, मागील दोन दिवसांपासून राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. शिंदे गटाऐवजी भाजपला मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे पालकमंत्रिपद हवे असल्याचे बोलले जात आहे. सहकारमंत्री सावे किंवा रोहयोमंत्री भुमरे यांच्यापैकी एकाला संधी मिळावी; परंतु कृषिमंत्री सत्तार यांना दूर ठेवावे, यासाठीदेखील काहीजण मुख्यमंत्र्यांना भेटल्याची चर्चा आहे. आ. संजय शिरसाट यांनी बंडखोरी करण्यासाठी सर्व आमदारांची मोट बांधली आणि त्यांनाच ऐनवेळी मंत्रिपदाने हुलकावणी दिली. त्यामुळे ते नाराज आहेत. असे असले तरी त्यांनी गुरुवारी शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांना शिंदे गटात खेचले. त्रिवेदींना शिंदे गटात आणून त्यांनी मुख्यमंत्र्यांची स्वत:वर असलेली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

मुख्यमंत्री निर्णय घेतीलकेंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना पालकमंत्री कोण होणार, सहकारमंत्री सावे की रोहयो मंत्री भुमरे, की या दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होणार, यावर डॉ. कराड यांनी सांगितले, पालकमंत्री कोणाला करायचे हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. ते ज्यांच्याकडे जबाबदारी देतील, तो पालकमंत्री होईल. सहकारमंत्री सावे यांना विचारले असता त्यांनीदेखील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, असे सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAbdul Sattarअब्दुल सत्तारAtul Saveअतुल सावेSandeepan Bhoomraसंदीपान भुमरे