शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

बदलापूर घटनेतील नराधमांना फाशी देण्याच्या मागणीसाठी भाजपची निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 20:09 IST

नाजूक घटनेवरही विरोधक राजकारण करीत असल्याचा मंत्री अतुल सावे यांचा आरोप

छत्रपती संभाजीनगर: बदलापूर येथील घटनेतील नराधमांविरोधात जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना फासावर लटकविण्यात यावे, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने मंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. आरोपींना फाशी झालीच पाहिजे अशा घोषणा आंदोलक देत होते. 

बदलापूर येथील शाळकरी मुलींवरील अत्याचाराच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीने राज्यभर आंदोलन छेडल्याचे समजातच भाजपनेही आंदोलनाची हाक दिली होती. गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सकाळी क्रांतीचौक येथे भाजपने निदर्शने केली. बदलापूर येथील चिमुरडींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशी झालीच पाहिजे, अशा घोषणा आंदोलक देत होते. या आंदोलनात भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, दीपक ढाकणे, लक्ष्मिकांत थेटे, जालिंदर शेंडगे, समीर राजूरकर, अमृता पालोदकर, वर्षा साळुंके, मनीषा भंसाळी, डॉ. उज्वला दहिफळे, मीना मिसाळ, शितल खरात,आशा खरात,सुवर्णा धानोरकर, जयश्री दाभाडे, लक्ष्मण शिंदे, मनोज पांगारकर, अशोक दामले, बबन नरवडे, महेश माळवदकर, ज्ञानेश्वर गायकवाड, अर्जून गवारे,संतोष बोधक भाजपच्या विविध विंगचे पदाधिकारी उपस्थित होते.

स्त्री -पुरूष समानतेची घेतली शपथयावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भारतमातेला स्मरून स्त्री पुरूष समानतेची शपथ घेतली. यापुढे कुटुंब आणि सामाजात स्त्री, पुरूष समानतेची जाणीव व जागृतीसाठी अखंड प्रयत्न करण्यात येईल, वयाने ज्येष्ठ, कनिष्ठ स्त्रियांचा सन्मान, प्रतिष्ठा आणि आदर ठेवण्याचे कर्तव्य राहिल. स्त्रीशिक्षणाला आणि त्यांचे कल्याण, त्यांच्या प्रति सुरक्षिततेसाठी प्राणपणाने कार्य करण्याची शपथ यावेळी घेण्यात आली. स्त्रियांचा आदर, सन्मान न जपणाऱ्या प्रवृत्तीविरोधात लढण्याचे ध्येय राहिल, स्त्रियांप्रती छत्रपती शिवरायांचा आदर्श अखंडपणे समोर ठेेवेन असे या शपथेत नमूद करण्यात आले.

स्त्री,पुरूष समानतेबाबत जनजागृती करणारचिमुरडीवरील अत्याचाराच्या नाजूक घटनेवर महाविकास आघाडी राजकारण करीत असल्याचा आरोप मंत्री अतुल सावे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलाना केला. ते म्हणाले की, चिमुरडीवरील अत्याचाराच्या घटनेतील नराधमांना फाशी व्हावी, ही समाजाची भूमिका आहे. आज आम्ही येथे स्त्री-पुरूष समानतेची शपथ घेतली. शिवाय आमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्त्री,पुरूष समानतेबाबत समाजात जनजागृती करणार आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBJPभाजपा