शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

भाजप, एमआयएमचे संबंध कळेना ! माझ्यापेक्षा बागडेंनी एमआयएमच्या आमदाराला बोलण्याची दिली जास्त संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 20:01 IST

अब्दुल सत्तार यांनी फुलंब्रीतील कार्यक्रमात बागडेंच्या उपस्थितीत मारला टोला 

ठळक मुद्देराजकीय पोळी भाजून घ्यायची, ही भाजप आणि एमआयएमची पद्धत आहे. याचा प्रत्यय मला हरिभाऊ बागडे विधानसभा अध्यक्ष असताना येत होता. 

फुलंब्री : राज्यात युतीच्या सत्तेत  हरिभाऊ बागडे विधानसभेचे अध्यक्ष असताना त्यांनी सभागृहात मला बोलण्याची फार कमी संधी दिली. याउलट ते माझ्यापेक्षा एमआयएमच्या आमदाराला बोलण्याची जास्त संधी देत होते. त्यामुळे भाजप आणि एमआयएमचे काय संबंध होते ते मला अजूनही कळाले नाही, असा टोला महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी फुलंब्री तालुक्यातील खामगाव फाटा येथे रविवारी झालेल्या कार्यक्रमात बागडे य यांना लगावला.  

खामगाव फाटा येथे शासकीय कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी अब्दुल सत्तार होते. यावेळी व्यासपीठावर हरिभाऊ बागडेही उपस्थित होते. अब्दुल सत्तार आपल्या खास शैलीत म्हणाले की, भाजप आणि एमआयएमचे संबंध काय आहेत, हे अजूनही बहुतांश लोकांना कळलेले नाहीत. त्यात मीसुद्धा आहे. निवडणुकीच्या काळात एकमेकांवर जहरी टीका करायची आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची, ही भाजप आणि एमआयएमची पद्धत आहे. याचा प्रत्यय मला हरिभाऊ बागडे विधानसभा अध्यक्ष असताना येत           होता. बागडे यांच्यासंबंधीची तक्रार करताना अब्दुल सत्तार यांनी एमआयएमच्या आमदारास त्यांच्याकडून सातत्याने प्राधान्य मिळत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला पणनचे संचालक शिवाजी दसपुते, राष्ट्रवादीचे जिल्हाप्रमुख कैलास पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, बांधकाम सभापती किशोर बलांडे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन देशमुख, तालुकाप्रमुख राजेंद्र ठोंबरे, तहसीलदार शीतल राजपूत, सहायक निबंधक विष्णू रोडगे, सभापती चंद्रकांत जाधव, उपसभापती राहुल डकले, शिवाजी पाथ्रीकर, प्रभाकर आदी उपस्थित होते. 

केंद्राकडून सूडाचे राजकारणखैरे म्हणाले की, महाराष्ट्र कोरोनाच्या संकटाचा सामना करीत असताना केंद्र सरकारला अनेक संघटना व उद्योजकांनी आर्थिक मदत केली. मात्र, केंद्राने राजकीय सूडापाेटी महाराष्ट्राला एका रुपयाचीही आर्थिक मदत केली नसल्याचा आरोप केला.  

कृषी विधेयकाबाबत अफवा केंद्र सरकारच्या कृषी विधेयकातून शेतकरी आपला शेतीमाल कोठेही आणि कोणालाही सहज विक्री करू शकतो. मात्र, विरोधक अफवा पसरवून  शेतकऱ्यांच्या भावना भडकविण्याचे काम करीत आहेत, असा आरोप आमदार हरिभाऊ बागडे यांनी केला. मागील वर्षी मका खरेदीसाठी केंद्राने मंजुरी दिली; पण राज्याला खरेदीसाठी लागणारा बारदानाही उपलब्ध करता आला नसल्याची टीका त्यांनी केली. 

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारHaribhau Bagadeहरिभाऊ बागडेAurangabadऔरंगाबादImtiaz Jalilइम्तियाज जलीलBJPभाजपा