शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

भाजपकडून छत्रपती संभाजीनगर पालिकेसाठी १००० इच्छुकांच्या मुलाखती; आता होणार सर्वेक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 19:34 IST

निवडणुकीत खर्च किती करणार? या प्रश्नावरून अनेक इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली.

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरात व दिल्लीमधील संस्थांकडून भाजप प्राथमिक पाहणी करणार आहे. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी उर्वरित ११ प्रभागांतील इच्छुक ५०० उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. चिकलठाणा येथील भाजपच्या विभागीय कार्यालयामध्ये सकाळी ८ वाजेपासून दुपारी ३ पर्यंत मुलाखती सुरू होत्या. ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, आ. अनुराधा चव्हाण, माजी महापौर बापू घडमोडे, माजी शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, अनिल मकरिये आदी पॅनल प्रमुखांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. फुलंब्री व पूर्व मतदारसंघ, पश्चिम मतदारसंघातील प्रभागांचा यात समावेश होता.

गुरुवारी १ ते १८ प्रभागांसाठी सुमारे ५०० जणांच्या मुलाखती घेतल्या होत्या. आज दुसऱ्या दिवशी १९ ते २९ या प्रभागांसाठी ५०० जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या. भाजपकडून एकूण १४०० जणांनी उमेदवारी अर्ज नेले होते. त्यातील १००० जणांनीच मुलाखती दिल्या. भाजपने प्रत्येक प्रभागातून ८ जणांची नावे निश्चित केली आहेत. या निवडलेल्या इच्छुकांच्या नावानुसार पुढील सहा दिवसांत सर्वेक्षण होऊन किती जागा भाजपने लढाव्यात, याचा प्राथमिक अंदाज बांधला जाणार आहे.

खर्च किती करणार? या प्रश्नावरून नाराजी...निवडणुकीत खर्च किती करणार? या प्रश्नावरून अनेक इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली. पक्षासाठी केलेले काम, निष्ठा या सगळ्या गोष्टींचा मुलाखत घेणाऱ्यांना विसर पडला आहे का? अशी भावना देखील अनेकांनी व्यक्त केली. पक्षनेत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे देताना इच्छुकांना काही वाटले नाही, परंतु खर्चाचा प्रश्न विचारताच अनेकांची विकेट गेली. प्रभाग असल्यामुळे कमी पैशांत निवडणूक होईल, आयोगाने दिलेल्या खर्च मर्यादेतही विजय मिळवता येईल, असा दावाही काही इच्छुकांनी मुलाखतीत केला.

प्रमुख सत्ताधारी पक्ष असल्याने भाजपकडे इच्छुकांची भली मोठी रांग आहे. त्यामुळे मुलाखती घेणाऱ्यांचीही कसोटी आहे. ११ प्रभागांच्या मुलाखती शुक्रवारी तर १८ प्रभागांच्या गुरुवारी झाल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Interviews 1000 Candidates for Aurangabad Municipal Corporation, Surveys Next

Web Summary : BJP interviewed 1000 candidates for Aurangabad Municipal Corporation elections. Surveys will follow to assess BJP's strength. Candidate's willingness to spend on the election became a point of contention during interviews.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक २०२६BJPभाजपा