छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदेसेनेत युती झाली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दोन्ही पक्षांकडून काही ठिकाणी बी-फॉर्म दिला गेला. आता तो परत कसा घेणार असा प्रश्न आहे. भाजपच्या कोअर कमिटीचे शुक्रवारी दिवसभर या विषयावर मंथन झाले. परंतु, आता आमने-सामने लढण्याशिवाय काहीही पर्याय नसल्याचे दिसते आहे.
पैठणमध्ये जे उमेदवार उभे आहेत, त्यांना पुरस्कृत करायचे की त्यांचा अर्ज मागे घ्यायचा, याबाबत शनिवारी बैठक होऊन निर्णय होणार आहे. जिल्ह्यातील अनेक गटांमध्ये व गणांमध्ये महायुतीच्या उमेदवारांनी बी-फाॅर्मसह उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठक होऊनही महायुतीला तडा गेला. २७ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. या काळात काही ठरले तर ठीक अन्यथा जिल्हा परिषद व पंचायत समितीत शिंदेसेना व भाजप आमने-सामने लढणार, हे निश्चित आहे.
बी-फॉर्म दिला आहे...भाजपने बी-फॉर्म दिला आहे. तो परत कसा घेणार, असा प्रश्न आहे. महायुतीला ब्रेक करण्याची सुरुवात शिंदेसेनेकडून झाली. त्यामुळे आम्हालादेखील बी-फॉर्म द्यावा लागला. पैठणमधील परिस्थितीवर काय निर्णय घ्यायचा याबाबत शनिवारी बैठक होऊन निर्णय होईल.- डॉ. भागवत कराड, खासदार
शिंदेसेनेने ११ ठिकाणी दिले उमेदवारशिंदेसेनेने ११ ठिकाणी भाजपच्या विरोधात उमेदवार उभे केले. त्यामुळे आम्हालादेखील उमेदवारांना बी-फॉर्म द्यावे लागले. यावर काय करायचे, याबाबत पुढील एक-दोन दिवसांत चर्चा करून निर्णय घेऊ. बी-फॉर्म ठेवायचे की नाही, यावर वरिष्ठांना विचारू.- अतुल सावे, ओबीसी कल्याणमंत्री
Web Summary : BJP debates B-form withdrawal for local elections after alliance partner fielded candidates against them. MahaYuti faces challenges as both parties nominated candidates, potentially leading to direct contests. A decision on candidate withdrawals is expected soon.
Web Summary : भाजपा स्थानीय चुनावों के लिए बी-फॉर्म वापस लेने पर विचार कर रही है, क्योंकि गठबंधन सहयोगी ने उनके खिलाफ उम्मीदवार उतारे हैं। महायुति को चुनौतियों का सामना करना पड़ रहा है क्योंकि दोनों दलों ने उम्मीदवार नामित किए हैं, जिससे सीधा मुकाबला हो सकता है। उम्मीदवार वापस लेने पर जल्द ही निर्णय होने की उम्मीद है।