शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपातर्फे संजय केनेकर यांचे नाव निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2021 18:09 IST

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाच्या कोअर कमिटीच्या सदस्यांशी चर्चा करून संजय केनेकर यांचे नाव भाजपा, महाराष्ट्रतर्फे निश्चित केले.

औरंगाबाद : विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे (BJP ) औरंगाबादचे शहर जिल्हाध्यक्ष संजय केनेकर ( Sanjay Kenekar ) यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वीच औरंगाबादमधील डॉ. भागवत कराड ( Dr. Bhagvat Karad ) यांना भाजपने केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपदी स्थान दिले आहे. यातच आता विधानपरिषदेसाठी संजय केनेकर यांना उमेदवारी निश्चित करण्यात आल्याने शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबादवर भाजपचेही विशेष लक्ष असल्याचे दिसत आहे. 

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाच्या कोअर कमिटीच्या सदस्यांशी चर्चा करून संजय केनेकर यांचे नाव भाजपा, महाराष्ट्रतर्फे निश्चित केले आणि तशी शिफारस केली आहे. भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या अनुमतीने केंद्रीय निवडणूक समितीकडून संजय केनेकर यांची उमेदवारी लवकरच जाहीर होईल. निवडणूक अर्ज भरण्याची मुदत १६ नोव्हेंबर असून केंद्रीय समितीकडून नाव निश्चित झाल्यावर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत संजय केनेकर लवकरच अर्ज दाखल करतील. 

विधानसभा सदस्यांमार्फत होणारी ही निवडणूक भारतीय जनता पार्टी पूर्ण सामर्थ्यानिशी लढेल आणि जिंकेल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. तर मागील ३३ वर्षांपासून निष्ठेने काम केल्याने पक्षाने मोठी संधी दिली. पोटनिवडणुकीची लढत कठीण आहे. मात्र, महाआघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये ताळमेळ नाही. यामुळे सरकारमधील सर्व आमदार नाराज आहेत. यातूनच चमत्कार करून भाजप ही निवडणूक जिंकेल असा विश्वास केनेकर यांनी व्यक्त केला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBJPभाजपाVidhan Parishadविधान परिषद