शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपची कोंडी अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 23:54 IST

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना पराभव पचवावा लागला. या पराभवाचे शल्य शिवसेनेच्या नेतेमंडळींमध्ये घर करीत ...

ठळक मुद्देपराभवाचे शल्य : भाजप नगरसेवकांची ट्रॅक्टरला उघड मदत

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना पराभव पचवावा लागला. या पराभवाचे शल्य शिवसेनेच्या नेतेमंडळींमध्ये घर करीत आहे. ७ जून रोजी महापालिकेत सभापतीपदाची निवडणूक घेण्यात येणार आहे. सेना-भाजप युतीमध्ये यंदा हे पद भाजपला देण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या अनेक नगरसेवकांनी उघडपणे हर्षवर्धन जाधव यांचे काम केले. त्यामुळे सेना खैरे यांच्या पराभवाचा वचपा काढण्याच्या तयारीत आहे.मागील २० वर्षांपासून चंद्रकांत खैरे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडून येत होते. त्यांची विजयी घोडदौड रोखण्यासाठी कन्नडचे आ. हर्षवर्धन जाधव निवडणूक मैदानात उतरले. जाधव यांच्या प्रचारात भाजपचे अनेक नेते, कार्यकर्ते, नगरसेवक उतरले होते. उघडपणे ही सर्व मंडळी काम करीत होती. २३ एप्रिल रोजी मतदानाच्या दिवशी अनेक वॉर्डांमध्ये खैरे यांच्या विरोधात भाजपने काम केल्याचे दिसून आले. याबाबतची तक्रारही खैरे यांनी सेना-भाजप नेत्यांकडे केली होती. गुरुवार २३ मे रोजी मतमोजणीनंतर अवघ्या ४ हजार ४९२ मतांनी खैरे यांना पराभव स्वीकारावा लागला.महापालिकेतील स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक ७ जून रोजी घेण्यात येणार आहे. भाजपतर्फे राजू शिंदे, पूनम बमणे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी सेनाही सभापतीपदासाठी उमेदवार देईल, असा अंदाज बांधण्यात येत आहे. सेनेतर्फे कोणाला उमेदवारी द्यावी यावर सध्या पक्षांतर्गत विचार सुरू आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असला तरी ऐनवेळी सेनेकडून उमेदवारी निश्चित होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपला सभापतीपद द्यायचे नाही, असा सूर सेना नगरसेवक, कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये आहे. स्थायी समितीमध्ये एकूण १६ सदस्य आहेत. सर्वाधिक मते सेनेकडे आहेत. एकूण ५ मते सेनेकडे आहेत. सेना ज्याला पाठिंबा देईल, त्याच्या गळ्यात स्थायी समिती सभापतीपदाची माळ पडेल.मनपा निवडणुकीतही कोंडीपुढील वर्षी मनपाच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत. या वेळेस पॅनल पद्धतीने निवडणुका होणार आहेत. सेनेच्या विरोधात ज्या नगरसेवकांनी काम केले त्यांची यादीच सेना नेत्यांनी तयार करून ठेवली आहे. युतीत राहून दगाफटका देणाऱ्यांना विजयी होऊ द्यायचे नाही, असाही निर्णय घेण्यात आल्याचे कळते.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाPoliticsराजकारणShiv Senaशिवसेना