शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

५० फुट उंच झाडावर मांजात अडकलेल्या कावळ्याचा पक्षीप्रेमींनी वाचवला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 20:06 IST

उंच शिडीचा आधार घेऊन अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर कावळ्याला सुखरूप काढले तेव्हा उपस्थितांनी जल्लोष केला. 

औरंगाबाद : मागील तीन दिवसांपासून गारखेडा परिसरातील ५० फूट उंच झाडावर मांजात अडकलेल्या कावळ्याला वाचविण्यासाठी पक्षीप्रेमींनी केलेल्या धडपडीला यश आले. उंच शिडीचा आधार घेऊन अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर कावळ्याला सुखरूप काढले तेव्हा उपस्थितांनी जल्लोष केला. 

गारखेडा येथील सूतगिरणी क्वॉर्टर परिसरात निलगिरीच्या झाडावर मागील ३ दिवसांपासून एक कावळा मांजामध्ये अडकला होता. ही बाब येथील पक्षीप्रेमी विशाल जाधव यांच्या लक्षात आली. त्यांनी लगेच पक्षी अभ्यासक डॉ. किशोर पाठक यांना माहिती दिली. त्यांनी सर्पमित्र मनोज गायकवाड यांना घटनास्थळी पाठविले. निलगिरीच्या झाडावर उंचावर मांजामध्ये कावळ्याचा पाय अडकला होता. तो अन्न-पाण्याविना लटकत होता. त्याखालून ११ के.व्ही.ची  विद्युत तार लटकत होती. 

पक्षीप्रेमी पवन जाधव यांनी त्यांच्याकडील हायड्रोलिक शिडी असलेली गाडी आणली. महावितरणचे वायरमन राजू रत्नपारखी आणि विशाल जाधव यांनी एक तासासाठी फिडर बंद केले.  हायड्रोलिक शिडी ३० फूट उंच नेली. तरीही आणखी २० फूट अंतर बाकी होते. मग २० फुटांचा बांबू आणून त्यास वरील बाजूस कोयता लावण्यात आला. मनोज गायकवाड व पवन जाधव यांनी मांजा कापण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत खाली जमलेल्या लोकांनी मोठी सतरंजी धरली. मांजा कापला जाताच कावळा अलगद सतरंजीवर पडला. 

एका पक्ष्याचा जीव वाचविल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता.   मांजामुळे कावळ्याला जखम झाली होती. त्याला उपचारासाठी डॉ. किशोर पाठक यांच्या संस्थेत दाखल करण्यात आले. झाडावरून कावळ्याला काढण्यासाठी संजय लवटे, बाळू लहाने, विशाल घायाळ  यांनीही मदत केली. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादdoctorडॉक्टरSocialसामाजिक