शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकने दुचाकीस्वारांना उडवले; एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

By बापू सोळुंके | Updated: May 6, 2023 17:33 IST

दोघांपैकी एकाची प्रकृती गंभीर असून त्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे

छत्रपती संभाजीनगर: सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकचालकाने ट्रिपलसीट दुचाकीस्वारांना चिरडल्याची घटना शनिवारी दुपारी केम्ब्रिज चौक ते चिकलठाणा रस्त्यावरील इस्लामिक हॉटेलजवळ घडली. या भीषण अपघातअपघातात एक तरूण ठार झाला तर दोन तरूण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अक्षय सतीश बडदे(१९) असे मृताचे नाव आहे. तर या घटनेत सद्दाम जैनी शेख (२०)आणि भगवान गोरे(२० सर्व रा. शेवगाव, जि. अहमदनगर)हे जखमी झाले आहेत.पोलिसांनी ट्रकचालकास ताब्यात घेतले आहे.या घटनेविषयी प्राप्त माहिती अशी की, शेवगाव येथील रहिवासी असलेली ही तिन्ही मित्र शनिवारी  दुपारी त्यांच्या शेवगाव येथून मोटारसायकलने (क्रमांक एमएच १६डीबी ५६९८) छत्रपती संभाजीनगरला येत होते. केम्ब्रिज चाैक ते चिकलठाणा रस्त्यावर ते असताना त्यांच्या गॅस सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांना उडवले. या भीषण घटनेत तिघेही ट्रकखाली आले. यात अक्षय आणि भगवान ट्रकच्या  पुढील चाकाखाली आले. यात अक्षयच्या पोटावर चाक गेल्याने तो ऑन दी स्पॉट ठार झाला. तर भगवानचा पाय  चाकाखाली आल्याने तो गंभीर जखमी झाला. तर सद्दाम हा रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्याला मार लागून जखमी झाला.

अपघातास्थळाजवळील इस्लामिक हॉटेलमध्ये बसलेले लोक मदतीला धावले. रूग्णवाहिका बोलावून त्यांना घाटी रुग्णालयात रवाना केला. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक गौतम पातारे, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी चौरे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर घटनास्थळाचा पंचनामा केला. ट्रक आणि मृताची मोटारसायकल ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेली.

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबाद