शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बदली झालेल्या १४७६ शिक्षकांची होणार चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 15:41 IST

प्राथमिक शिक्षण विभागाचा निर्णय; संवर्ग -१ मध्ये बदली झालेल्या सर्वच शिक्षकांचा समावेश

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांच्या बदल्यांतील गोंधळाच्या चाैकशीने आता निर्णायक वळण घेतले आहे. बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचे उघडकीस आल्यानंतर ९ शिक्षकांना निलंबित करण्यात आल्यानंतर ४९ शिक्षकांच्या चौकशीचे आदेश निघाले आहेत. त्यात ४९ शिक्षकांची संघटनांकडून मिळालेली यादीच वादात सापडली आहे. त्यामुळे बदल्यांतील संवर्ग-१ मधील सर्वच १४७६ शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली.

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या बदल्यांसाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात आली आहे. त्यात सर्वच संवर्गातील ३ हजार ६७८ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. या बदल्यांसाठी विविध संवर्ग पाडण्यात आले होते. त्या संवर्गाचा लाभ घेण्यासाठी संबंधित शिक्षकांकडून ऑनलाइन माहिती मागविली होती. त्या माहितीमध्ये काही शिक्षकांनी खोटी माहिती सादर केली. काहींनी सोयीच्या ठिकाणी, जवळच्या ठिकाणी बदलीसाठी शारीरिक अपंगत्वाची, आजारपणाची खोटी प्रमाणपत्रे जोडल्याचे समजले. या प्रकरणांमध्ये विविध शिक्षक संघटनांनी निवेदने देत चौकशीची मागणी केली. त्यासाठी आंदोलनेही करण्यात आली. त्यावरून ९ शिक्षकांचे निलंबन करण्यात आले. त्यानंतरही तक्रारींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता शिक्षण विभागाने बदलीत ‘संवर्ग-१’चा लाभ घेणाऱ्या सर्वच शिक्षकांच्या कागदपत्रांच्या तपासणीचा निर्णय घेतला. त्यानुसार विभागाकडून कार्यवाही सुरू आहे. त्यात १ हजार ४७६ शिक्षकांचा समावेश संवर्ग १ चा लाभ घेणाऱ्यांच्या यादीत आहे.

‘त्या’ शिक्षकांची चौकशी लांबणीवरशिक्षक संघटनांच्या समन्वय समितीने दिलेल्या स्मरणपत्रासोबत ४९ शिक्षकांची चाैकशीसाठी यादी जोडण्यात आली होती. त्या शिक्षकांच्या चौकशीचे आदेश शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी काढले होते. परंतु संबंधित समन्वय समितीचे पत्रच बनावट असल्याचा दावा काही संघटनांनी केला. त्यामुळे ‘त्या’ ४९ शिक्षकांची चौकशी लांबणीवर पडल्याची माहिती आहे. याविषयी शिक्षक भारती संघटनेतर्फे सरसकट तपासणी करण्याची मागणी केली. तसेच ४९ शिक्षकांची नावांची यादी तयार करीत त्यांची बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात कार्यवाहीची मागणीही संघटनेने सीईओ अंकित यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. या निवेदनावर राज्य संपर्कप्रमुख संतोष ताठे, जिल्हाध्यक्ष राजेश भुसारी, संजय बुचुडे, प्रशांत नरवाडे, विजय ढाकरे, देवानंद सुरडकर, बाबासाहेब शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Probe ordered for 1476 teachers transferred in Chhatrapati Sambhajinagar district.

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar's teacher transfer scam deepens. Following fake documents, 1476 teachers under 'Category-1' now face scrutiny. Earlier, nine teachers were suspended and 49 were under investigation, but the list was disputed. Now, all Category-1 teachers' documents will be verified.
टॅग्स :Teacherशिक्षकchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरzp schoolजिल्हा परिषद शाळा