शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मोठ्या परताव्याच्या आमिषाने १२ जणांची ४७ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 23:57 IST

दरमहा सात टक्के दराने परतावा देण्याचे आमिष दाखवून १२ जणांची ४७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विजयनगर येथील कॅपिटल ग्रोथ कंपनीच्या दोन संचालकांविरोधात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा नोंदविण्यात आला.

औरंगाबाद : दरमहा सात टक्के दराने परतावा देण्याचे आमिष दाखवून १२ जणांची ४७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विजयनगर येथील कॅपिटल ग्रोथ कंपनीच्या दोन संचालकांविरोधात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा नोंदविण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करीत असून, आरोपीचा शोध पोलिसांनी सुरू केला.रत्नेश प्रभाकरराव हस्तक (वय ५७, रा. एन-९, एम-२, ज्ञानेश्वरनगर, हडको) आणि अजय अशोक जोशी (रा. ब्रीजवाडी), अशी आरोपींची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, उल्कानगरी येथील रहिवासी प्रवीण प्रभाकरराव हस्तक हे आॅटोमोबॉईल गॅरेज चालवितात. २०१५ मध्ये त्यांच्या ओळखीच्या एका जणाने त्यांना सांगितले होते, तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर विजयनगर येथील ग्रोथ कॅपिटल या कंपनीत कर, ते चांगला परतावा देतात. त्यामुळे तक्रारदारांनी कंपनीच्या कार्यालयात जाऊन गुंतवणूक योजनेविषयी माहिती जाणून घेतली. त्यावेळी आरोपींनी त्यांना गुंतविलेल्या रकमेवर दरमहा सात टक्के दराने अठरा महिने व्याज देतो. त्यानंतर तुम्हाला तुमची रक्कम परत करतो, असे सांगितले. विशेष म्हणजे हे व्याज दरमहा तुमच्या बँक खात्यात जमा केले जाईल, असे नमूद के ले. रक्कम परत करण्यासाठी पुढील तारखेचा धनादेशही आगाऊ प्रदान करतो, असे सांगितल्याने तक्रारदारांनी आरोपीच्या कंपनीत ३ लाख रुपये भरले. त्यांच्याप्रमाणेच दिलीप भीमराव निकम, धन्वंतरी निकम, शांताराम पाटील, चंद्र्रनील परब, गणेश वाघमारे, भीमराव शेणफडू पाटील, चंद्रकांत विक्रम पाटील, योगिनी भामरे, पराग रत्नपारखी, मिलिंद मुळे, विजय धोटे यांच्यासह इतरांकडून वेगवेगळ्या, असे एकूण ४४ लाख रुपये त्यांनी घेतले. प्रवीण यांच्याप्रमाणे अन्य एकाही तक्रारदाराच्या बँक खात्यात आरोपींनी एक रुपयाही जमा केला नाही. यामुळे तक्रारदारांनी आरोपींना भेटून व्याजाच्या रकमेची वेळोवेळी मागणी केली असता प्रत्येक वेळी ते वेगवेगळी कारणे सांगून वेळ मारून नेत. दरम्यान, मुदत संपल्यानंतरही आरोपींनी व्याज न दिल्याने तक्रारदारांनी त्यांना मुद्दल रकमेची मागणी केली. तेव्हा त्यांनी मुद्दल देण्यासही नकार दिला.धनादेश झाले अनादरितआरोपींनी तक्रारारदांना मुद्दल रकमेचे धनादेश दिले होते. हे धनादेश तक्रारदारांनी बँकेत जमा केले असता ते न वटता परत आले. धनादेश अनादरित झाल्यामुळे आरोपींनी आपली मुद्दामहून आणि कट रचून फसवणूक केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार नोंदविली. निरीक्षक श्रीकांत नवले तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस