शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

एसटी प्रवासात आता चिल्लरचे वांधे; भाडेवाढीनंतर प्रवासी-वाहकांमध्ये वादविवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 14:35 IST

२०१८ मध्ये ५ रुपयांच्या पटीत भाडेवाढ करण्यात आली होती. आताच्या भाडेवाढीत ११ रुपये, १६ रुपये, २३ रुपये असे दर ठेवण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर : एसटी बसेसच्या तिकीट दरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून १४.९५ टक्के वाढ करण्यात आली. परंतु, भाडेवाढीमुळे सुट्या पैशांचा प्रश्न निर्माण होत असून, पहिल्याच दिवशी प्रवासी आणि वाहकांमध्ये वाद झाले.

२०१८ मध्ये ५ रुपयांच्या पटीत भाडेवाढ करण्यात आली होती. आताच्या भाडेवाढीत ११ रुपये, १६ रुपये, २३ रुपये असे दर ठेवण्यात आले. त्यातून प्रवासात सुटे पैसे देणे-घेण्यावर वाद होत आहेत.

पाचच्या पटीत दर आकारणी कराभाडेवाढ करताना पूर्णांक व अपूर्णांकाचा, ग्रामीण प्रवाशांचा, सुट्या पैशांचा विचार करण्यात आला नाही. सुट्या पैशांवरून प्रवासी आणि वाहकांमध्ये वादविवाद होत आहेत. त्यामुळे पाचच्या पटीत भाडे आकारणी करण्यात यावी, अशी मागणी शिव परिवहन वाहतूक व कामगार सेनेने एका निवेदनाद्वारे परिवहन मंत्र्यांकडे केल्याची माहिती संघटनेचे मकरंद कुलकर्णी यांनी दिली.

सामाजिक माध्यमांवर व्हायरल मेसेज- उठा उठा वाहक बंधूंनो, सकाळ झाली, एक-एक रुपया मागायची वेळ झाली.- दिवाळीत दरवाढ झाली की, एसटी कामगारांना बोनस दिला म्हणून तिकीट दर वाढले. पण, आता ‘लाडकी बहीण, लाडका भाऊ’ यांना द्यायला पैसे पाहिजेत म्हणून वाढ केली, अशी कुजबूज प्रवासी करत आहेत.- सर्व महिला वाहकांना नम्र विनंती. ड्यूटीवरून घरी गेल्यावर नवऱ्यावर रागावू नका. भाजीत मीठ जास्त टाकू नका. उगीच ड्यूटीचा राग नवऱ्यावर काढू नका.- चिल्लर येत राहील, जात राहील.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरstate transportएसटी