शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मोठी कारवाई! खुलताबादेतील गुटखा निर्मितीचा कारखाना पोलिसांच्या विशेष पथकाकडून उध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 13:11 IST

गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता गोरखधंदा; एक ट्रक व २ दोन टेम्पो भरून कारखान्यातील साहित्य जप्त

- सुनील घोडकेखुलताबाद: खुलताबाद शहराजवळील मावसाळा ते खिर्डीरोडवरील एका मंगल कार्यालयाच्या परिसरात गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेला गुटखा( सुंगधित तंबाखू) निर्मितीचा कारखाना आयपीएस अधिकारी महक स्वामी यांच्या विशेष पथकाने बुधवारी रात्री उध्वस्त केला आहे. या प्रकरणात जवळपास २६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ४ जणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आयपीएस अधिकारी असलेल्या महक स्वामी यांनी मावसाळा-खिर्डी रोडवरील या मंगल कार्यालयात बुधवारी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान छापा मारला. या गुटखा निर्मितीच्या कारखान्यात रात्री ११ वाजेपर्यंत एक एक साहित्य जमा केले. यात विविध तंबाखू, गुटखा निर्मितीसाठी लागणारे साहित्य, मशिनरी हे सर्व साहित्य जप्त करून एक ट्रक व २ दोन टेम्पोत भरून रात्री खुलताबाद पोलीस ठाण्यात आणण्यात आले. 

याप्रकरणी अन्नसुरक्षा अधिकारी वर्षा ताराचंद रोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, मोहमंद फरीद मोहमंद झकेरिया वय 50 वर्ष, अनिसाबानो मोहमंद फरीद वय 48 वर्ष ( दोन्ही रा.कटकट गेट हत्तीसिंगपुरा छत्रपती संभाजीनगर), हुसेन मोहमंद सिध्दीकी झुडा वय 49 वर्ष,  ईरफान हारुन तेली वय 45 वर्ष ( दोघे रा.सेवा मंगल कार्यालय खिर्डी ता.खुलताबाद) यांच्या विरूध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अन्नसुरक्षा अधिकारी वर्षा रोडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, यातील आरोपीतांनी संगनमत करुन उपरोक्त महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखुची चोरटी विक्री करण्याकरिता साठा केला आहे. तसेच सुगंधिंत तंबाखू तयार करण्याच्या उद्देशाने कच्चे अन्न पदार्थ व पँकिंग करिता वापरण्यात येणारे  साहित्याचा साठा केला आहे. तसेच सदर प्रतिबंधित अन्न पदार्थांची चोरटी वाहतूक करण्याच्या उद्देशाने वाहने बाळगल्याचे निदर्शनास आले. तसेच अवैधरित्या आर्थिक फायदा मिळविण्याच्या दृष्टीने खाणाऱ्या व्यक्तीस गंभीर दुखापत होऊ शकते याची जाणीव असून देखील कायद्याद्वारे विक्रीसाठी व उत्पादनासाठी प्रतिबंधित केलेला व जनतेच्या आरोग्यास अपायकारकसुगंधित तंबाखू हा विक्री करिता उत्पादन, पॅकिंग व वाहतुकीच्या उद्देशाने साठा करुन अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ चे उलंघन केले यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक धनंजय फराटे हे करत आहे. 

गेल्या वर्षी पत्रकारावर गुन्हा केला दाखलखुलताबाद येथील एक पत्रकाराने गेल्या वर्षी या कारखान्यात शिरून गुटखा निर्मिती कशी होती याबाबत खुलासा केला होता. तेथील कामगार व मालकाच्या मुलाचे फुटेज देखील यात होते. मात्र, त्यानंतर या कारखान्याच्या मालकाने तत्कालीन पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्याला हाताशी धरून पत्रकार अमोल काळे यांच्याच विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. परंतु, बुधवारी झालेल्या कारवाईत कारखाना उघडकीस आल्याने या गुटखा निर्मिती कारखान्यास पोलीस प्रशासनातील मोठे अधिकारी व काही लोकप्रतिनिधीचा आशीर्वाद असल्याची चर्चा खुलताबाद तालुक्यात सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद