शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बिडकीन ग्रामसेवक मृत्यू प्रकरण : विस्तार अधिकारी साळवे, ग्रामसेवक पोतदार निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 13:33 IST

बिडकीन ग्रामपंचायत तपासणी करण्याच्या कारणाखाली वारंवार मानसिक त्रास देत पाच लाखांची मागणी केल्याचा आरोप बिडकीन पोलिसांत दाखल तक्रारीत शिंदे यांच्या पत्नी प्रतिभा शिंदे यांनी केला आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कारवाई

औरंगाबाद : बिडकीन येथील ग्रामसेवक संजय शिंदे यांच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांनी शुक्रवारी विस्तार अधिकारी भास्कर साळवे आणि चितेगाव येथील ग्रामसेवक तुळशीराम पोतदार यांचेही निलंबन केले. शिंदे यांच्या मृत्यूप्रकरणी सर्वप्रथम पैठणचे गटविकास अधिकारी विजय लोंढे यांचा पदभार काढण्यात आला. तर ग्रामविकास अधिकारी व पैठण ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष सखाराम दिवटे यांचे निलंबन गुरुवारी करण्यात आले होते.

बिडकीन ग्रामपंचायत तपासणी करण्याच्या कारणाखाली वारंवार मानसिक त्रास देत पाच लाखांची मागणी केल्याचा आरोप बिडकीन पोलिसांत दाखल तक्रारीत शिंदे यांच्या पत्नी प्रतिभा शिंदे यांनी केला आहे. आरोप झालेल्यांमध्ये पैठण गटविकास अधिकारी विजय लोंढे, ग्रामविकास अधिकारी सखाराम दिवटे, विस्तार अधिकारी भास्कर साळवे आणि चितेगाव येथील ग्रामसेवक तुळशीराम पोतदार यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांनी कारवाईचा बडगा उचललेला आहे. तर महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार पुढील आठ दिवसांत चौकशी पूर्ण होईल. यात आरोप असलेल्या चौघांचीही चौकशी होईल. त्यानंतर चौकशीचा अहवाल तयार करुन ग्रामविकास विभागाच्या सचिवांकडे पाठवण्यात येईल ते पुढील निर्णय घेतील. ग्रामविकास विभागाकडूनही याप्रकरणी विचारणा झाली असल्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे यांनी सांगितले.

पैठणला होईल २७ जानेवारीला चौकशीअतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची स्थापना करण्यात आली असून २७ जानेवारीला पैठण पंचायत समिती येथे या प्रकरणाशी संबंधित ग्रामसेवक, विस्तार अधिकारी पंचायत, सहायक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, वरिष्ठ सहायक यांनी आवश्यक त्या पुराव्यासह हजर राहण्याचे आदेश सहायक गटविकास अधिकारी के. एम. बागुल यांना देण्यात आले आहेत. डाॅ. गोंदावले यांनी बागुल यांच्याकडे लोंढे यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला.

युनियनने नोंदवले ग्रामसेवकांचे जबाबग्रामसेवक युनियन कडून बिडकीन येथे बीडीओ आणि त्यांच्या दलालासंदर्भात असलेल्या ग्रामसेवकांच्या असलेल्या तक्रारी आणि त्यासंदर्भात म्हणणे नोंदवून घेण्यात आले. दहा ते बारा जणांनी जबाब दिले. परंतु गुरुवारी आरोप करणारे शुक्रवारी फिरकले नाहीत. हे जबाब २७ जानेवारीला चौकशी समितीसमोर सादर करणार असल्याचे ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष भीमराज दाणे पाटील यांनी सांगितले.

असे प्रकार खपवून घेणार नाहीबीडीओंवर कारवाईचे अधिकार मंत्रालयीन स्तरावर आहेत. त्यासंबंधीचा चौकशी अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात येईल. कर्मचाऱ्यांची कोणत्याही पद्धतीची पिळवणूक आणि संस्थेची प्रतिमा मलिन होईल असे कोणतेही प्रकार खपवून घेतले जाणार नाही. ग्रामसेवक शिंदे यांच्या मृत्यू प्रकरणात आरोप असलेल्या तिघांचेही निलंबन केले आहे. बीडीओंचाही पदभार काढला आहे.- डॉ. मंगेश गोंदावले, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, औरगाबाद

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदsuspensionनिलंबनAurangabadऔरंगाबाद