शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मनपा कारभाऱ्यांची वाकडी चाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 00:56 IST

शहर विकास आराखड्यानुसार ६० पेक्षा अधिक डी.पी. रस्त्यासाठी महापालिकेने मागील दोन दशकांपासून भूसंपादनच केलेले नाही. टीडीआर आणि एफएसआय देऊन रस्ते रुंद करण्याचे प्रभावी अस्त्र हाती असताना अंमलबजावणीसाठी पैैसा नाही, असे तद्दन खोटे कारण देत प्रशासन जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहर विकास आराखड्यानुसार ६० पेक्षा अधिक डी.पी. रस्त्यासाठी महापालिकेने मागील दोन दशकांपासून भूसंपादनच केलेले नाही. टीडीआर आणि एफएसआय देऊन रस्ते रुंद करण्याचे प्रभावी अस्त्र हाती असताना अंमलबजावणीसाठी पैैसा नाही, असे तद्दन खोटे कारण देत प्रशासन जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यावर कडी करीत पदाधिका-यांनी भूसंपादनासाठी तब्बल २२०० कोटी रुपये लागतील, असा अंदाज बांधून, राज्य शासनाने हा निधी द्यावा, अशी मागणी करण्याची तयारी सुरू केलीआहे; परंतु ६० पैकी अनेक रस्त्यांच्या भूसंपादनासाठी महापालिकेला एक रुपयाही खर्च करण्याची गरज पडणार नाही, अशी सध्याची स्थिती आहे.नगररचना विभाग दोन शहर विकास आराखड्यांवर काम करते. एक जुन्या शहरातील विकास आराखडा, दुसरा मनपात समाविष्ट १८ खेड्यांच्या संदर्भातील आराखडा होय. सर्वोच्च न्यायालयात सध्या जुन्या शहराच्या विकास आराखड्याचा वाद सुरू आहे. २००० मध्ये मनपा हद्दीत समाविष्ट १८ खेड्यांसाठी मंजूर विकास आराखड्याची आजपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही.या रस्त्यांची संख्या ६० पेक्षा अधिक आहे; परंतु महापालिका प्रशासनाने आतापर्यंत डी.पी. रोडसाठी भूसंपादनच केले नाही. जेथे गरज होती, तेथेच भूसंपादन केले. पडेगाव, मिटमिटा आदी भागांतील डी.पी. रस्त्यांवर अनेक भूमाफियांनी प्लॉटिंग करून जमीन विकून टाकली; परंतु महापालिका प्रशासनाने त्याची साधी दखलही घेतली नाही.भविष्यात विकास आराखड्यानुसार डी.पी. रोड शोधायला महापालिकेचे अधिकारी निघाल्यास तेथे हजारो घरे दिसतील. एवढ्या घरांवर बुलडोझर कसा फिरवणार, म्हणून महापालिकेतील राजकीय मंडळींमधील माणूस जागा होईल. जुन्या शहरातील अनेक डी.पी. रस्ते याच पद्धतीने गायब झाले आहेत. जालना रोडवरील सिंचन भवनसमोरून १०० फूट डी.पी. रोड आहे. कैलासनगर भागात रोडवरील घरे पाहून महापालिकेने यापूर्वीच माघार घेतली आहे.भूसंपादनासाठी महापालिकेने डी.पी.आर, एफएसआयचा वापर जास्तीत जास्त करावा, असे शासनाचे निर्देश आहेत. यानंतरही महापालिका प्रशासन अंमलबजावणी करायला तयार नाही. आता भूसंपादनासाठी २२०० कोटी रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात येणार असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाcivic issueनागरी समस्या