शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

टाळेबंदीत बीबी का मकबरा काळवंडला, पुरातत्त्व सर्वेक्षणच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष,  मनो-यावर उगवल्या वनस्पती, तडेही गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 06:41 IST

सध्या पर्यटन केंद्रे बंद असल्याने दुरुस्तीची कामे कोणत्याही अडथळ्याविना सहज करणे शक्य आहे. मकबºयाच्या संवर्धनासाठी तीन वर्षांपासून निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जाते.

- योगेश पायघनऔरंगाबाद : दख्खन का ताज म्हणून विख्यात असलेला बीबी का मकबरा आणि त्याचे दिमाखदार उंच मनोरे आता पुरते काळवंडले आहेत. प्लास्टरच्या जागोजागी खपल्या पडल्या आहेत, मनोºयावर वनस्पती उगवल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये संवर्धनाची कामे का केली जात नाहीत, तसेच तीन वर्षांपासून रखडलेल्या संवर्धनाच्या कामांना मुहूर्त कधी लागेल, असा सवाल केला जात आहे.सध्या पर्यटन केंद्रे बंद असल्याने दुरुस्तीची कामे कोणत्याही अडथळ्याविना सहज करणे शक्य आहे. मकबºयाच्या संवर्धनासाठी तीन वर्षांपासून निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जाते. दोन वर्षांपूर्वी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या महासंचालक डॉ. उषा शर्मा यांनी पाहणीवेळी संवर्धनाकडे झालेल्या दुर्लक्षावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. संवर्धनासाठी सहा महिन्यांची मुदत दिली होती. त्यानंतर काहीशा हालचाली झाल्या. जुजबी दुरुस्तीनंतर पुन्हा मकबºयाचे संवर्धन थंड बस्त्यात पडले आहे.आता लॉकडाऊनचे निमित्त‘लोकमत’ने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे अधीक्षक डॉ. दिलीपकुमार खमारी यांना विचारल्यावर त्यांनी लॉकडाऊननंतर यावर बोलू, असे ते म्हणाले.अंदाजपत्रक मंजुरीनंतरसरली तब्बल तीन वर्षेसंवर्धनासाठी अंदाजपत्रक मंजूर होऊन निविदाही निघाली. मात्र, गाडी कुठे अडली हे गुलदस्त्यात आहे. पुरातत्व विभागाच्या निकषांत बसणारे चुन्याचे दर्जेदार काम करणारे कारागीर मिळत नसल्याचे कारणही याबद्दल सांगितले जाते, तर कधी निविदा घ्यायलाच कुणी पुढे येत नाही, असे काही अधिकारी सांगतात.सध्या पर्यटक नसल्याने ऐतिहासिक वास्तूंच्या दुरुस्त्या आणि संवर्धनासाठी त्याचा वापर पुरातत्व विभागाने करून घ्यायला हवा होता. ऐतिहासिक वारसे सांभाळण्याकडे या विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष, टाळाटाळ होत आहे. मकबºयाच्या बाहेरील भिंतींना तडे जात आहेत. तेथील किमान साफसफाई, दुरुस्ती करणे अपेक्षित होते.- अ‍ॅड. स्वप्नील जोशी, इतिहासप्रेमी

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद