शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

भुजल पातळीत तब्बल २.१५ मीटरने घट

By admin | Published: February 21, 2016 11:53 PM

बालासाहेब काळे, हिंगोली सततच्या अवर्षणाचा सामना करीत असलेल्या हिंगोली जिल्ह्यात मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा जानेवारी अखेर भुजल पातळीत तब्बल २.१५ मीटरने घट झाली आहे.

बालासाहेब काळे, हिंगोलीसततच्या अवर्षणाचा सामना करीत असलेल्या हिंगोली जिल्ह्यात मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा जानेवारी अखेर भुजल पातळीत तब्बल २.१५ मीटरने घट झाली आहे. येत्या महिनाभरात साधारणत: दीडशे गावांमध्ये जलसंकट अधिक गडद होणार असल्याची चिन्हे आहेत.भुजल सर्वेक्षण यंत्रणा विभागाने हिंगोली जिल्ह्याची पाणी पातळी मोजण्यासाठी ५५ विहिरी निश्चित केल्या आहेत. साधारणत: तीन महिन्याच्या अंतराने या निरीक्षण विहिरींतील पाण्याची पातळी वाढली किंवा कमी झाली आहे काय? हे पाहण्यासाठी जलपातळी मोजली जाते. सध्या ऊन वाढू लागल्याने फेब्रुवारीतच टंचाईच्या झळा अधिक तीव्र होत आहेत. जानेवारी अखेर भूजल सर्वेक्षण विभागाने निरीक्षण विहिरीतील पाणीपातळी मोजली असता जिल्ह्याच्या भुजल पातळीत सरासरी २.१५ मीटरने घट झाल्याचे दिसून आले. यात औंढा तालुक्याची पाणी पातळी २.३९ मी., वसमत तालुका- २.३५, हिंगोली तालुका- १.२०, कळमनुरी तालुका १.५७ आणि सेनगाव तालुक्याची पाणी पातळी २.१६ मीटरने खालावली आहे. यावर्षी हिंगोली व कळमनुरी तालुक्याच्या भूजल पातळीत प्रचंड प्रमाणात घट झाली आहे. एप्रिल, मे महिन्यात ही पातळी आणखी खोल जाण्याची शक्यता आहे. शिवाय यापुढे दोन महिन्याच्या कालावधीत नदी-नाले, विहिरी, तलाव कोरडे पडतात. यामागे जिल्ह्यातील नागरिकांना यावर्षी भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने जवळपास १० गावांमध्ये जानेवारी अखेर टँकरने पाणी पुरवठा सुरू केला आहे. येलदरी धरणात ४६ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. सिद्धेश्वर धरणाचा जीवंत साठा संपला असून त्यात केवळ १६९.८९ दलघमी म्हणजे १८.९९ टक्के पाणी शिल्लक आहे. इसापूर धरणात १८३.०४ दलघमी पाणी उपलब्ध आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या पाणी पातळी तपासणीचा अहवाल प्रशासनाकडे सादर केला जाणार आहे. दरम्यान सेनगाव तालुक्यातील ४५, औंढा तालुक्यातील ३०, हिंगोली तालुक्यातील २६, कळमनुरी तालुक्यातील २५ आणि वसमत तालुक्यातील २० गावांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.