शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

भागवत कराड यांचे भेटीगाठींचे सत्र सुरू; वाटाघाटीत जागा भाजपाला सुटेल अशी अपेक्षा

By विकास राऊत | Updated: March 28, 2024 17:19 IST

जागा कुणाला सुटणार, याची नेमकी माहिती आ. शिरसाट यांच्याकडून मिळते काय, याची चाचपणी करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.

छत्रपती संभाजीनगर : भाजपाकडून औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ लढविण्यासाठी इच्छुक केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आ. संजय शिरसाट, खा. राहुल शेवाळे यांच्यात बुधवारी मुंबईत जागावाटपावरून चर्चा झाली. दोन दिवसांपूर्वी आ. शिरसाट आणि डॉ. कराड यांची भेट झाली होती. त्यानंतर शिरसाटांच्या कार्यालयात या दोघांमध्ये चर्चा होऊन मुंंबईत भेट घेण्याचे ठरले. त्यानुसार बुधवारी डॉ. कराड हे आ. शिरसाटांच्या मुंबईतील घरी गेले होते. जागा कुणाला सुटणार, याची नेमकी माहिती आ. शिरसाट यांच्याकडून मिळते काय, याची चाचपणी करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. भाजपाच्या गोटातून शिंदे गटात सर्व सपंर्क अभियान राबविण्यात येत आहे.

आ. शिरसाट यांनी बोलावले होते...शिंदे गटाचे प्रवक्ते आ. शिरसाट यांनी मुंबईत त्यांच्या निवासस्थानी चर्चेसाठी बोलविले होते. त्यामुळे चर्चेसाठी आम्ही गेला होतो. शिंदे गट जागा लढू शकणार की नाही, यावर साधक-बाधक चर्चा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वस्तुस्थिती मांडण्यात येणार आहे, त्यानंतर पुढील निर्णय होईल.- डाॅ. भागवत कराड, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री

आज तिढा सुटेल...डॉ. कराड हे लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे सर्वांच्या भेटी घेऊन ते मोट बांधत आहेत. त्या अनुषंगाने माझ्याकडेही आले होते. भाजपाला जागा सुटावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. बुधवारी रात्रीतून काय होईल, हे सांगता येत नाही. गुरुवारी जागा वाटपाचा तिढा सुटेल. शिंदे गटाचा दावा कायम आहे, आम्ही उमेदवार आयात करून ही जागा लढणार नाही.--आ. संजय शिरसाट, प्रवक्ता शिंदे गट शिवसेना

जागा भाजपालाच सुटेल...प्रदेशपातळीवर शेवटच्या क्षणापर्यंत ही जागा भाजपाला सुटावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आमची संघटन बांधणी पूर्ण झालेली आहे. प्रत्येक बूथपर्यंत आम्ही पाेहोचलो आहोत. भाजपाचा खासदार करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता तळमळीने काम करण्याचा दावा करीत आहे. शिंदे गटाला जागा सुटणार या सध्या तरी अफवा आहेत.---संजय केणेकर, प्रदेश सरचिटणीस

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटBhagwat Karadडॉ. भागवतlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Aurangabadऔरंगाबाद