शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

वाहनधारकांनो सावधान! जालना रोडलगतचा भाग खचला; गॅस पाईपलाईन बुजवण्यात हलगर्जीपणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 09:01 IST

वाहणाऱ्या पाण्यात खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता...

- श्रीकांत पोफळे

करमाड ( औरंगाबाद) : मागील काही महिन्यांपूर्वी जालनारोडच्या बाजूने सीएनजी गॅस पाईपलाईन टाकण्यात आली आहे. मात्र, पाइपलाईन  बुजवत असताना दबाईकरणाकड अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. योग्य प्रकारे दबाई न झाल्यामुळे जालना रोडच्या लगतचा पाईपलाईनवरील भाग खचला असून तीनचार फुटापर्यंत खोल खड्डे पडलेले आहेत. शेंद्रा पाटीवर या खड्ड्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. जोरदार पावसात रोडच्या बाजूने पाणी वाहतांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही त्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो.

मागील सहा महिन्यांपूर्वी औरंगाबाद-जालना महामार्गाला लागून सीएनजी गॅस ऑनलाईन पुरवठा होण्याच्या दृष्टीने गॅस पाईपलाईन टाकण्यात आली. औरंगाबाद जालना महामार्गावर या पाईप लाईनमुळे सर्वच पेट्रोल पंपावर २४ तास सीएनजी उपलब्ध होण्यास निश्चितच मदत होणार आहे. वाहनधारकांना तासन्तास लाईनीत उभा राहण्याच्या कटकटीपासून सुटका मिळणार आहे. त्यादृष्टीने हे काम देखील महत्त्वाचे होते. मात्र, हे करत असताना संबंधित ठेकेदाराने पाइपलाइन टाकल्यानंतर नाली बुजविण्याच्या कामाचे दबाईकरण योग्यरीत्या न केल्यामुळे औरंगाबाद- जालना महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.

विशेष म्हणजे, या पाईपलाईनचे काम होत असतानाच जवळपास 15 जणांचे अपघाती बळी गेले आहेत. आता रस्त्या लगतचा भाग खचल्याने पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने तात्काळ याची दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनधारकांसह पंचक्रोशीतील नागरिक करत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJalanaजालनाAccidentअपघात