शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सावधान, ‘एलईडी स्क्रोलिंग बोर्ड’ही होतो ‘हॅक’, पोलिसांनी व्यापाऱ्यांना प्रात्यक्षिकच दाखवले

By राम शिनगारे | Updated: December 9, 2022 20:17 IST

पोलिस याबाबत सतर्क असून व्यापाऱ्यांसह विक्रेत्यांची बैठक घेतली आहे

औरंगाबाद : शहरात एलईडी स्क्रोलिंग बोर्डच्या वापराबाबत पोलिस सतर्क झाले आहेत. कोणत्याही प्रकारे गैरप्रकार होऊ नये, यासाठी पोलिस आयुक्तालयात गुरुवारी शहरातील बोर्ड तयार करणाऱ्यांसह व्यापारी व पोलिस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सायबर पोलिसांनी बोर्ड हॅक होऊ शकतो, याचे प्रात्यक्षिकही व्यापाऱ्यांना दाखविले; तसेच कोणत्या प्रकारची खबरदारी घेण्यात यावी, याविषयी मार्गदर्शन केल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमे यांनी दिली.

शहरातील एलईडी स्क्रोलिंग बोर्ड तयार करणारे असेंब्लर, उत्पादक यांनी बोर्ड तयार करून विकताना प्रत्येकवेळी स्ट्राँग सेक्युरिटी असलेला पासवर्ड दिला पाहिजे. तो सर्वसामान्य असू नये, विकणाऱ्यांनी प्रत्येक ग्राहकांचे ‘केवायसी’चे रेकॉर्ड जतन करून ठेवले पाहिजे. प्रत्येक ग्राहकास पासवर्ड कसा बदलावा, याविषयीचे प्रशिक्षण मिळावे. कोणत्याही प्रकारचा पासवर्ड व सिक्युरिटी पिन नसणाऱ्या एलईडी स्क्रोलिंग बोर्डांची विक्री व खरेदीही करू नये, ग्राहकांनी पासवर्ड व सुरक्षा पिन बदलताना कोणालाही शेअर करू नये, दुकान बंद करताना एलईडी स्क्रिनही बंद ठेवावा, प्रत्येक वापरकर्त्यांनी एलईडी स्क्रोलिंग बोर्डची नोंदणी स्थानिक पोलिस ठाण्यात केली पाहिजे. हा स्क्रिन लावला जाणार आहे, त्या जागेच्या मालकी हक्काची किंवा भाडेकराराची कागदपत्रे पोलिसांकडे द्यावीत आणि वायफाय, ब्लूटूथचा ॲक्सेस देण्यात येऊ नये, अशा सूचना पोलिसांनी व्यापाऱ्यांना केल्या आहेत.या बैठकीला पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर, सहायक आयुक्त विशाल ढुमे, सायबरचे निरीक्षक गौतम पातारे, सहायक पोलिस निरीक्षक अमोल सातोदकर यांच्यासह सर्व पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी