शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सावधान ! स्वस्तात मालमत्ता घ्याल, तर होईल घोर फसवणूक; खरेदीपूर्वी अशी करा खात्री

By मुजीब देवणीकर | Updated: August 14, 2025 17:30 IST

मुख्य रस्ते, आरक्षित जागांवरील मालमत्ता विकण्याचा सपाटा

छत्रपती संभाजीनगर : शहरात सध्या महापालिकेकडून रस्ता रुंदीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत मुख्य रस्त्यांवरील हजारो मालमत्ता बाधित होत आहेत. काही मालमत्ताधारकांनी अव्वाच्या सव्वा दराने मालमत्ता विक्रीला काढल्या आहेत. रस्त्यांमुळे मालमत्तेचा काही भाग बाधित हाेणार हे विक्री करताना कोणीही सांगायला तयार नाही ! घर, दुकान, खुले प्लॉट स्वस्तात मिळत असल्याचे पाहून अनेक नागरिक व्यवहार सुद्धा करीत आहेत. त्यातून खरेदी केलेल्या मालमत्ताधारकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत.

शहर विकास आराखडा एप्रिल २०२५ मध्ये मंजूर झाला. त्यामध्ये काही रस्ते मोठे करण्यात आले. काही मोठे रस्ते लहान केले. या शिवाय खासगी जागांवर दवाखाने, पार्किंग, शाळा, अग्निशमन केंद्र आदी सोयी सुविधांसाठी आरक्षणे टाकण्यात आली. ज्या ठिकाणी आरक्षणे पडली आहेत, ते फक्त जमीन मालकालाच माहीत. तेथे बांधकाम परवानगी भेटत नाही. जुनी घरे, दुकाने असतील, तर ती भविष्यात पाडली जातील. त्यामुळे काही चतुर मालमत्ताधारकांनी स्वस्त दरात मालमत्ता विक्रीला काढल्या आहेत. त्याचप्रमाणे मुख्य रस्त्यांवरील घरे, रो-हाऊस, फ्लॅट, दुकाने विक्रीला काढली आहेत. सोशल मीडियावर मालमत्ता विक्रीच्या पोस्ट टाकण्यात येतात. विशेष बाब म्हणजे बाजार मूल्यानुसार अत्यंत कमी दराने मालमत्ता विक्रीला आहेत. त्यामुळे दर पाहून अनेकजण खरेदीसाठी सरसावत असल्याचे चित्र पाहायला मिळते. खरेदीनंतर आपली फसवणूक झाल्याचे अनेकांच्या लक्षात आले.

फसवणूक झाल्यावर चौकशीमालमत्ता खरेदी केल्यावर ती रस्त्यात किती बाधित होत आहे, याची चौकशी करण्यासाठी अनेक मालमत्ताधारक महापालिकेच्या नगररचना विभागात येतात. ८ ते १० फुट मालमत्ता बाधित होणार हे कळाल्यावर त्यांच्या पायाखालची वाळू सरकते. व्यवहार करण्यापूर्वी नागरिक महापालिकेच्या नगररचना विभागात येऊन कधीच चौकशी करीत नाहीत.

खरेदीपूर्वी अशी करा खात्रीमहापालिकेच्या वेबसाईटवर नवीन विकास आराखड्याचे सर्व नकाशे उपलब्ध आहेत. नागरिकांनी तेथे जाऊन खात्री करावी. कळत नसेल तर मनपाच्या नगररचना विभागात जाऊन चौकशी करावी. या शिवाय ९४८५२०२०२० या व्हाॅट्सॲप क्रमांकावर हाय पाठवून कोणती सेवा हवी ते सांगावे. त्यात डीपी लिहून आल्यावर त्या वेबसाइटवर जाऊन झोन टाकावा. तेथे आरक्षण, रस्ता रुंदीकरण सर्व पाहता येईल, असे नगररचना उपसंचालक मनोज गर्जे यांनी सांगितले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका