शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

स्वार्थातून आईचाच विश्वासघात; सांभाळण्यासाठी दिलेली २ लाखांची दागिने, घराची कागदपत्रे मुलगा आणि सूनेने हडपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 12:55 IST

crime news in Aurangabad : याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून तिची  सून आणि मुलाविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ठळक मुद्देलहान मुलासोबत वाद झाल्याने महिला मोठ्या मुलाच्या घरी गेलीमोठ्या मुलाने आणि सुनेने चोरीची भीती दाखवत दागिने, कागदपत्रे ठेऊन घेतली

औरंगाबाद : विश्वासाने सांभाळण्यासाठी दिलेले सव्वा दोन लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने आणि घराच्या मालकी हक्काची कागदपत्रे मुलगा आणि सून यांनी हाडपल्याचा प्रकार नुकताच नारेगांव येथे समोर आला. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून तिची  सून आणि मुलाविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुलजार बेग मुघल बेग (४०,रा. नारेगांव) आणि आयेशा बेगम अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की , तक्रारदार रेहाना बेगम मुघल बेग या चिकलठाणा परिसरातील हिनानगर येथे लहान मुलगा आणि सूने सोबत राहतात. १३ ऑक्टोंबर रोजी त्यांचा सून आणि मुलासोबत किरकोळ वाद झाला. यानंतर त्या रागारागाने नारेगाव येथे राहणारा मोठा मुलगा गुलजारच्या घरी राहण्यास गेल्या. यावेळी त्यांनी सोबत नेलेले अर्धा किलो चांदीचे तोडे, २०ग्रॅम सोन्याची एकदाणी, ६ ग्रॅमचे गंठण, दहा ग्रॅमच्या सोन्याचा अंगठ्या, चांदीची वाळे, पट्ट्या आणि घराची कागदपत्रे विश्वासाने आरोपी सुन आणि मुलाकडे ठेवण्यासाठी दिले. 

राग शांत झाल्यानंतर १७ ऑक्टोंबर रोजी त्या लहान मुलाकडे हिनानगर येथे जाण्यासाठी निघाल्या तेव्हा त्यांनी दागिने आणि कागदपत्रे परत मागितले असता तुम्ही तेथे एकटे राहता. दागिने आणि कागदपत्रे चोरी जाऊ शकते असे म्हणून ते आमच्याकडे सुरक्षित  राहू द्या असे त्यांनी सांगितले. यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून १७ ऑक्टोबर रोजी  रेहाना या घरी गेल्या. दरम्यान काही दिवसांनी गुलजार आणि त्याची पत्नी रेहाना यांना भेटण्यासाठी गेला तेव्हा रेहाना यांनी त्यांच्याकडे दागिने आणि घराच्या कागदपत्राची मागणी केली असता. त्यांनी दागिने आणि कागदपत्रे मिळणार नाही, तुला काय करायचे कर, असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. मुलगा आणि सुनेने विश्वासघाताने सुमारे सव्वा दोन लाखाचा ऐवज आणि कागदपत्रे हाडपल्याचे  लक्षात येताच त्यांनी शुक्रवारी रात्री एमआयडीसी सिडको  पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा  नोंदवून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादFamilyपरिवार