शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

तनवाणींची माघार अन् २४ तास सर्वसामान्यांच्या सुख दु:खात धावून जाण्याचा फायदा: प्रदीप जैस्वाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 13:08 IST

२४ तास सर्वसामान्यांमध्ये राहणारा मी आहे. सुख-दु:खात धावून जातो. त्यामुळे मला सर्वच समाजाचा पाठिंबा मिळत आहे.

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाचा मागील काही वर्षांमध्ये सर्वांगीण विकास केला. ज्या वसाहतींमध्ये नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात चिखलातून ये-जा करावी लागत होती, तेथे दर्जेदार सिमेंट रस्ते दिले. ड्रेनेजलाइन आदी कामे केली. २४ तास सर्वसामान्यांमध्ये राहणारा मी आहे. सुख-दु:खात धावून जातो. त्यामुळे मला सर्वच समाजाचा पाठिंबा मिळत आहे. किशनचंद तनवाणी यांनी निवडणुकीतून माघार घेतली ही माझ्यासाठी मोठी बाब असून, त्याचा फायदाच होईल, असे मत शिंदेसेनेचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

प्रश्न : निवडणुकीत तुमच्या विरोधात तनवाणी नसल्याने फायदा होईल का?उत्तर : निश्चितच फायदा होईल. मतविभाजन टाळण्यासाठीच त्यांनी हा निर्णय घेतला. त्यांनी मला पाठिंबाही दर्शविला असून, लवकरच ते उघडपणे माझ्यासाठी प्रचारही करणार आहेत.

प्रश्न : विजयाचा तुम्हाला किती टक्के विश्वास वाटतो?उत्तर : २०० टक्के मतदार माझ्या बाजूनेच कौल देतील. सर्वसामान्य, विद्यार्थी, महिला, व्यापारी, उद्योजक यांच्यासाठी आजपर्यंत मी काम करीत आलोय. सर्वसामान्यांशी माझे जिव्हाळ्याचे नाते आहे.

प्रश्न : मतदारसंघातील कोणतेही एक मोठे काम सांगा?उत्तर : मागील पाच वर्षांत स्वत:चा निधी, शासनाकडून प्राप्त झालेला विशेष निधी मोठ्या प्रमाणात आणला. विकास काय असतो, हे मी दाखवून दिले. नागरिक माझ्या कामावर खूश आहेत.

प्रश्न : महायुतीमधील घटक पक्षाचे नेते, कार्यकर्ते सोबत आहेत का?उत्तर : प्रश्नच नाही. शिंदेसेनेसह भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, कार्यकर्ते महायुती बळकट करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकaurangabad-central-acऔरंगाबाद मध्यPradeep Jaiswalप्रदीप जैस्वाल