शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
2
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
3
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
4
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
5
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
7
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
8
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
9
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
10
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
11
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
12
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
13
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
14
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
15
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
16
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
17
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
18
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
19
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी योजनेतून शेतकऱ्यांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:15 IST

जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी आदी योजनेतून जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकºयांना लाभ देण्यात आला. या योजना लाभार्थ्यांसाठी लाभकारी ठरल्या आहेत, असे प्रतिपादन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी प्रजासत्ताक दिनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार सदैव शेतकºयांच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

ठळक मुद्देदिवाकर रावते : फडणवीसांच्या नेतृत्वातील सरकार शेतकºयांच्या पाठीशी

औरंगाबाद : जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी आदी योजनेतून जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकºयांना लाभ देण्यात आला. या योजना लाभार्थ्यांसाठी लाभकारी ठरल्या आहेत, असे प्रतिपादन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी प्रजासत्ताक दिनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार सदैव शेतकºयांच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली.येथील पोलीस आयुक्त कार्यालयाच्या देवगिरी मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण रावते यांच्या हस्ते झाले. यावेळी रावते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर, पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त निपुण विनायक, जि. प.च्या सीईओ पवनीत कौर, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह आदींची उपस्थिती होती. रावते म्हणाले, जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने शासनाने दुष्काळ घोषित केला. उपाययोजनांची अंमलबजावणीही तात्काळ करण्यास सुरुवात केली.जनावरांच्या चाºयासाठी ज्या क्षेत्रात थोडेफार पाणी उपलब्ध आहे, त्याठिकाणी शासनामार्फत शेतकºयांना मोफत बियाणे, पाणी उपलब्ध करून देण्यात आले. गाळपेºयासाठी आकारणी करीत असलेले शुल्कदेखील चारा पिकांसाठी माफ केले. यामध्ये २१ हजारांपेक्षा अधिक शेतकºयांनी प्रतिसाद दिला असून, अडीच लाख मेट्रिक टन चाºयाची निर्मिती होणे अपेक्षित आहे.रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामांवर आजपर्यंत ५२ कोटी रुपये खर्च झाले आहेत. ५८ हजार ९०० मजुरांना रोजगार उपलब्ध झाला. जलयुक्त शिवार अभियानात ३०४ गावांमध्ये १ हजार ४०६ कामे सुरू आहेत. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत औरंगाबादमधील पहिल्या टप्प्यात ७७ आणि दुसºया टप्प्यात १९४ गावांमध्ये कामे सुरू आहेत.जिल्ह्यात ९८६ कोटी २८ लाखांची कर्जमाफीछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यात ९८६ कोटी २८ लाख रुपयांची कर्जमाफी करण्यात आली आहे. नागपूर-मुंबई द्रुतगती महामार्ग म्हणजेच समृद्धी महामार्गासाठी ज्या शेतकºयांनी सहकार्य करून आपली शेती दिली त्यांनासुद्धा बाजारभावापेक्षा पाचपट रक्कम देऊन समृद्धी महामार्गाने समृद्ध करण्याचे काम केले आहे. समृद्धीसाठी जमीन देणाºया शेतकºयांना सुमारे १ हजार ३०० कोटी रुपयांच्या मोबदल्यांचे वाटप करण्यात आल्याचे रावते म्हणाले.-------------

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिनAurangabadऔरंगाबाद