शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या गरिबीचा फायदा; प्रशासनात संवेदनांचा अभाव - हायकोर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 02:30 IST

फसवणुकीच्या घटना वाढत आहेत

- खुशालचंद बाहेतीऔरंगाबाद : शेतकऱ्यांची फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यांना कोर्टकचेऱ्या करणे परवडत नाही. याचा गैरफायदा व्यापारी घेतात. दुर्दैवाने प्रशासकीय यंत्रणाही शेतकऱ्यांसाठी संवेदनशील नाहीत, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. दिल्लीत चालू शेतकरी आंदोलनात व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक हाही एक मुद्दा असल्याने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. केळीचा व्यापार करणाऱ्या सानिया काद्री यांना मयूर खंडेलवाल यांनी स्थानिक बाजारपेठेपेक्षा जास्त भावाने केळी विक्री करण्याचे आश्वासन दिले. ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय असल्याने अनेक राज्यांत त्यांचे संबंध आहेत. बाहेरराज्यात विक्री करून जास्त पैसे मिळतील, असे त्यांनी सांगितले. तसा १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करारही केला. सानिया काद्री यांनी शेतकऱ्यांकडून केळी विकत घेऊन मयूर खंडेलवाल यांना दिली. खंडेलवाल यांनी परराज्यात विक्री करून जास्त दर मिळवून दिला. सुरुवातीला दररोज पैसेही दिले. नंतर मात्र पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली. पुढे सानिया काद्रींना टाळू लागले. तेव्हा मात्र फसवणूक झाल्याचे काद्रींच्या लक्षात आले. त्यांनी सावदा पोलीस ठाणे, जिल्हा जळगाव येथे मयूर खंडेलवाल, त्यांचे वडील कैलाश व इतरांविरुद्ध २ कोटी ७४ लक्ष रुपये फसवणुकीचा गुन्हा नोंदवला. खंडेलवाल व इतरांना या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळाला. पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. हा खटला रद्द व्हावा यासाठी खंडेलवाल यांनी ॲड. के.सी. संत यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याचिकेत त्यांनी व्यवहार केल्याचे, करार केल्याचे सर्व अमान्य केले. ही याचिका फेटाळताना उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांची फसवणूक करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचे निरीक्षण नोंदवले. शेतकऱ्यांच्या हतबलतेचा व्यापारी गैरफायदा घेतात. त्यांची कोर्ट-कचेरी करण्याची क्षमता नसते. याचा फायदा घेऊन शेतकऱ्याने मेहनतीने उत्पादन केलेल्या मालाचे पैसे व्यापारी बनवतात, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले. पोलिसांनी फसवणुकीची पूर्ण रक्कम हस्तगत झाली नसतानाही अटकपूर्व जामिनाविरुद्ध अपील दाखल केले नसल्याबद्दल उच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले.सुरुवातीला शेतकऱ्यांना आकर्षित केले गेले. पुढे शेतकऱ्यांचा विश्वास बसला की, योजनाबद्ध पद्धतीने पैसे देण्यात आले नाहीत आणि त्यांची फसवणूक झाली.दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी आहेत. त्यात फसवणुकीची भरच पडत आहे.-न्या. टी.व्ही. नलावडे आणि एम.जी. सेवलीकर, मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्ट