शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 21:23 IST

याप्रकरणी पुढील सुनावणी १९ ऑगस्ट रोजी होणार आहे. राजेभाऊ फड व करुणा मुंडे यांच्याकडून माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दोन स्वतंत्र निवडणूक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

बापू सोळुंकेछत्रपती संभाजीनगर : माजीमंत्री आमदार धनंजय मुंडे यांना त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या निवडणूक याचिकेत लेखी उत्तर दाखल करण्यासाठी शेवटची संधी देण्यात आली हाेती. परंतु मुंडे यांच्याकडून लेखी उत्तर दाखल करण्यात आले नाही. या प्रकरणात मुंडे यांच्याकडून १० हजार रुपये वसूल (काॅस्ट-शास्ती) करून संबंधित रक्कम खंडपीठ वकील संघास द्यावे, असे आदेश न्या. अरुण पेडणेकर यांनी दिले आहेत.

याप्रकरणी पुढील सुनावणी १९ ऑगस्ट रोजी होणार आहे. राजेभाऊ फड व करुणा मुंडे यांच्याकडून माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दोन स्वतंत्र निवडणूक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. बोगस मतदान व शपथपत्रामध्ये खोटी माहिती दडवून ठेवल्याच्या आरोप करत मुंडे यांच्या विधानसभा निवडणुकीतील निवडीला आव्हान दोन्ही याचिकेत देण्यात आले आहेत. या याचिकांवरील सुनावणीवेळी न्यायालयाने मुंडे यांना नोटिसा काढून म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यांना त्या नोटिसा प्राप्त होऊनही लेखी उत्तर दाखल केले नाही.

अखेर ८ ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने मुंडे यांना दोन्ही याचिकेत प्रत्येकी ५ हजार असे एकूण १० हजार रुपये वसूल करण्याचे आदेश काढले आहेत. ही रक्कम खंडपीठ वकिल संघाला देण्याचे आदेशात नमूद केले. याचिकाकर्त्या करुणा मुंडे यांच्याकडून ॲड. चंद्रकांत ठोंबरे यांनी तर राजेभाऊ फड यांच्या वतीने ॲड. सिद्धार्थ यावलकर यांनी काम पाहिले.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेCourtन्यायालय