लाडसावंगी गावातील सुका व ओला कचरा उचलून तो गावाबाहेर टाकण्यासाठी चौदाव्या वित्त आयोगातून लाडसावंगी ग्रामपंचायतीने पैसे खर्चून नवीन घंटागाडी खरेदी केली. या गाडीचा शुभारंभ दीड महिन्यापूर्वीच आजी माजी पुढाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला होता. शिवाय गावातील घराघरात ओला व सुका कचरा साठवण करण्यासाठी बकेट वाटप करण्यात आले होते. यात जवळपास दहा लक्ष रुपये खर्च झाला. मात्र, तेव्हापासून या घंटागाडीने एकही कचऱ्याची खेप गावाबाहेर न टाकल्याने ती आता शोभेची वस्तू बानली आहे. वरिष्ठांनी याची दखल घेऊन गावातील कचरा उचलून नेण्यासाठी घेतलेल्या घंटागाडीचा उपयोग करण्याची मागणी लाडसावंगी गावातील नागरिकांनी केली आहे.
कोट
गावातील तसेच परिसरातील शेतकरी कचरा टाकण्यास विरोध करीत असल्याने सध्या कचरा संकलनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी जागेचा शोध सुरू असून, जागा सापडल्यानंतर घंटागाडी सुरू करणार आहे.
- सुदाम पवार, सरपंच, लाडसावंगी
फोटो कॕॅप्शन : दीड महिन्यापूर्वी लाडसावंगी गावात घंटागाडीचा असा थाटात शुभारंभ करण्यात आला होता.