शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात वेग कमी होताच पाठीमागून बसची धडक; बाईकस्वाराचा जागीच मृत्यू

By सुमित डोळे | Updated: September 9, 2023 12:11 IST

हर्सूल रस्त्यावरील खड्ड्याने तरुणाचा जीव घेतला; दहा दिवसांपासून नवा रस्ता चौकोनी आकारात खोदून ठेवलेला

छत्रपती संभाजीनगर : शहरातून मिळालेले काम पूर्ण करण्यासाठी गावाकडून निघालेल्या ३़० वर्षीय मुख्तार रशीद शहा या तरुणाचा हर्सूल रस्त्यावरील खड्ड्याने जीव घेतला. शुक्रवारी दुपारी तो दुचाकीने शहराकडे येत असताना जुना नाक्याजवळ त्याला एसटी बसची धडक बसली. यात थेट डोक्यावरच पडल्याने मुख्तार याचा जागीच मृत्यू झाला.

मुख्तार चौक्याच्या पुढे असलेल्या हातमाळी गावचे रहिवासी होते. अन्य दोन भावांसोबत ते प्लंबिंगचा व्यवसाय करत. शुक्रवारी शहरातून कामाची ऑर्डर मिळाल्याने मुख्तार दुचाकीवरून शहराकडे निघाले होते. फुलंब्री हर्सूल रस्त्यावरील मथुरा लॉन समोरून येत असताना मोठ्या खड्ड्याजवळ वेग कमी करून त्याने बाजूने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, मागून येणाऱ्या एसटी बसचा वेग अधिक असल्याने बसची त्यास धडक बसली. यात मुख्तार खड्ड्यात कोसळला. घटनेची माहिती कळताच हर्सूलचे उपनिरीक्षक मारोती खिल्लारे यांनी धाव घेत त्यास जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. मात्र, मुख्तारचा जागीच मृत्यू झाला होता. घटनेनंतर बसचालक स्वत:हून ठाण्यात हजर झाल्याचे उपनिरीक्षक खिल्लारे यांनी सांगितले.

प्रशासनाचे दुर्लक्ष, अपघातात वाढस्थानिकांच्या माहितीनुसार, जळगाव महामार्गावर मनपाच्या जुन्या नाक्याजवळ दहा दिवसांपासून रस्त्यावर चौकोनी आकारात रस्ता खोदून ठेवला आहे. त्यानंतर त्याकडे संबंधित यंत्रणेने दुर्लक्ष केले. परिणामी, पावसामुळे त्यात पाणी साचले. त्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने दुचाकी चालक तो खड्डा टाळण्याचा प्रयत्न करतात. मुख्तारने तसाच प्रयत्न केला. मात्र, त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या अपघातानंतर दोन दुचाकी चालकांचा अपघात झाला. मात्र, वेळीच तोल सावरल्याने हानी टळली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघातDeathमृत्यू