शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्याशिवाय बीडची दहशत संपणार नाही: अंबादास दानवे

By बापू सोळुंके | Updated: February 14, 2025 13:45 IST

मंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा घेतला होता. नंतर ते त्यातून निर्देाष सुटला हा भाग वेगळा.

छत्रपती संभाजीनगर: संतोष देशमुख यांच्याशी संबंधित बातम्या पाहतो म्हणून एका जणाला बीड जिल्ह्यात मारहाण करण्यात आली. या घटनेतील आरोपी पाेलिसांना सापडत नाही, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडे हे एकमेकांच्या सावलीसारखे काम करतात. मंत्र्यांचा सहभाग असल्याशिवाय अशा घटना घडूच शकत नाही, जोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत बीडमधील दहशत संपणार नाही, अशी सडेतोड भूमिका विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत मांडली.

आ. दानवे म्हणाले की, मंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा घेतला होता. नंतर ते त्यातून निर्देाष सुटला हा भाग वेगळा. येथे मात्र आरोपी वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे घनिष्ठ संबंध जगजाहिर आहे. शिवाय कृषी साहित्य खरेदी घोटाळाही समोर आला. अशा परिस्थितीत त्यांनी नैतिक जबाबदारीने राजीनामा देणे आवश्यक होते. आगामी अधिवेशनात मात्र आम्ही त्यांना सोडणार नसल्याचे आ.दानवे म्हणाले.  

आता मिन्नतवारी नाही... ज्याला जायचे त्याने जावेछत्रपती संभाजीनगरमध्ये मेळावा आणि घरोघरी जाऊन बैठका घेऊनही उद्धवसेनेचे माजी नगरसेवक शिंदेगटात का गेले असा प्रश्न विचारला असता आ. दानवे म्हणाले की, लोक मोहापोटी पक्ष सोडतात. नगरसेवक गेले असले तरी पक्षसंघटन आमच्यासोबत आहे. पक्षाचा एकही शाखाप्रमुख, विभागप्रमुख,बूथ कार्यकर्ता अथवा अन्य पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडला नाही. यापुढे पक्ष आता कोणाचीही मिन्नतवारी करणार नाही. ज्याला जायचे त्याने खुशाल जावे अशा शब्दात त्यांनी पक्षाची भूमिका मांडली.  

आ.दानवेंची सामंजस्याची भूमिकाखासदार मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे जेवायला गेल्याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पक्षाच्या खासदारावर टीका केल्यानंतर खासदारांना आता जेवण्यासाठीही ठाकरेंकडून परवानगी घ्यावी लागेल,अशी टीप्पणी सत्ताधाऱ्यांनी केली आहे. याकडे लक्ष वेधले असता, आ.दानवे म्हणाले की, वर्षानुवर्ष एकाच पक्षात काम केले असल्यामुळे अनेकांचे व्यक्तिगत संबंध असतात. यामुळे जेवायला जाण्यासाठी परवानगी घेण्याची गरज नाही. आम्हीही शिंदेगटाच्या लोकांना भेटल्यानंतर बोलतोच म्हणजे फोडाफोडीचा विषय असतोच असे नाही, अशी सामंजस्याची भूमिका आ. दानवे यांनी घेतली.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेShiv SenaशिवसेनाDhananjay Mundeधनंजय मुंडेbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणwalmik karadवाल्मीक कराड