शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बीड, माजलगाव जाळपोळ पूर्वनियोजित नव्हती, असंतोषाचा उद्रेक झाला: ज्ञानेश्वर चव्हाण

By सुमित डोळे | Updated: December 30, 2023 18:23 IST

विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी पहिल्यांदाच व्यक्त केले स्पष्ट मत, अंतरवाली सराटीची घटना पोलिसांसाठी एक केस स्टडी, मनोधैर्य कमी होऊ देणार नाही; अनुभवातून शिकू

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण आंदाेलनादरम्यान बीड, माजलगाव येथे लोकप्रतिनिधींच्या घरावरील हल्ले आणि जाळपोळ या घटना पूर्वनियोजित कटाचा भाग नसावा. शिक्षण, नोकरीमुळे मनात असंतोष असलेले तरुण दंगेखोरांसमवेत सहभागी झाले व पुढे उद्रेक झाला असावा. ती एक तात्कालिक प्रतिक्रिया होती, असे स्पष्ट करत छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी या विषयावर सविस्तर भाष्य केले. ही घटना पोलिस विभागासाठी एक केस स्टडी असून, यातून खूप काही शिकून आम्ही सकारात्मकतेने वाटचाल करू. या सर्व घटना घडल्या असल्या तरी पोलिसांचे मनाधैर्य मात्र खचू देणार नाही, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.

डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी बुधवारी ‘लोकमत’ला भेट दिली. यावेळी त्यांनी ‘लोकमत कॉफीटेबल’ या उपक्रमांतर्गत संपादकीय विभागाच्या सहकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. या चर्चेत त्यांनी पोलिस विभागाच्या समस्यांवरही प्रकाश टाकला.

ऑगस्टमध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलनास सुरुवात झाली. त्यानंतर अंतरवाली सराटीसह जालना, बीड जिल्ह्यात मोठ्या घडामोडी घडल्या. लाठीचार्ज, आंदोलने, जाळपोळ, लाखोंच्या सभा पार पडल्या. अनेक पोलिस गंभीर जखमी झाले. वरिष्ठ पोलिस अधिकारी निलंबित झाले. या सर्व घडामोडींवर बोलताना डॉ. चव्हाण यांनी सांगितले की, पाेलिस सेवेत असे अनुभव येत असतात. बीडमधील आंदोलनात ९० टक्के तरुण हे २० ते ३० वयोगटातील आणि स्थानिक आहेत. त्या परिसरात कायम विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांची उपस्थिती असते. नोकरीचा अभाव आणि शिक्षणातील अडचणी यामुळे या तरुणांचा उद्रेक झाला असावा.

१. आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी होतेय. ते शक्य आहे का?- बीड, माजलगाव जाळपोळीत जवळपास पावणेतीनशे आरोपी आहेत. अटकेतील सर्व आरोपींविरोधात सीसीटीव्ही फूटेज व अन्य तांत्रिक पुराव्यांचे सबळ पुरावे आहेत. या प्रकरणी एसआयटीचा अहवालही वरिष्ठांसह गृहमंत्रालयाला सादर करण्यात आला आहे.

२. अटकसत्र सुरू राहील का?- हो. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांमध्ये तिघांना अटक आहे. जाळपोळ, तोडफोडीचा तपास अद्यापही सुरू आहे. आरोपी निष्पन्न करून शोध सुरू आहे.

३. मुंबईतील नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कारवाई होत असल्याच्या आरोपात तथ्य आहे का?- एकूणच कायदा-सुव्यवस्थेच्या अनुषंगाने रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाया सुरू आहेत. आंदोलनात चुकीचे घटक सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांकडून काळजी घेतली जात आहे.

प्रश्न- पोलिस वेळेवर पोहोचले नसल्याचा आरोप होतोय?- असे नाही. आंदोलन हिंसक होईल, असे अपेक्षितच नव्हते. अन्य ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनामुळे आमचा फोर्स विखुरला गेला होता.

प्रश्न- लाठीचार्जविषयी गैरसमज आहेत, असे दिसत आहे..- अंतरवाली सराटी आंदोलनात मनोज जरांगे यांनी आधी रुग्णालयात येण्याची तयारी दाखविली. त्यांना नेण्यासाठी पोलिस तेथे गेले होते. पोलिसांनी जाणीवपूर्वक लाठीचार्ज केला नाही. रुग्णालयात नेताना गैरसमज झाले. त्यातून दोन्ही बाजूने प्रतिक्रिया उमटली. अनेक पोलिस विनाहेल्मेट होते. त्यातून बचावात्मक पद्धतीने लाठीचार्ज झाला. यात आमचे १७ पेक्षा अधिक पोलिस, महिला पोलिस जखमी झाले.

निलंबनामुळे पोलिसांचे मनोधैर्यही खचले?- प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार येतात तसेच पोलिस विभागातही येतात. मनोधैर्य वाढवून आमची सकारात्मकतेने वाटचाल सुरू असते. असे प्रसंग कर्तव्याचा भाग असतात. आम्ही सकारात्मकतेने वाटचाल करू.

- छत्रपती संभाजीनगरच्या पुढील पोलिस आयुक्तपदासाठी तुमच्या नावाची चर्चा आहे. तुम्ही इच्छुक आहात का?-हा शासनस्तरावरील निर्णय आहे. मी शहरात साडेतीन वर्षे काम केले आहे. त्यातून शहराविषयी एक वेगळी आपुलकी, अनुभव आला आहे.

टॅग्स :BeedबीडAurangabadऔरंगाबादJalanaजालनाMaratha Reservationमराठा आरक्षण