शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या ७८ तासांच्या फडणवीस सरकारमुळे भाजपतील इच्छुकांच्या आशेवर विरजण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 16:49 IST

सरकार गेल्यामुळे महामंडळांवरील नियुक्त्या रद्द होण्याची भीती

ठळक मुद्देअनेकांचे मंत्रीपदाचे स्वप्न भंगले मागच्या सरकारात जिल्ह्यात भाजपाच्या वाट्याला आली अनेक पदे 

औरंगाबाद : मुख्यमंत्रीपदासाठीदेवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सकाळी ८ वा. १० मिनिटांनी शपथविधी घेतल्यामुळे भाजपमधील इच्छुकांच्या आशा महिनाभरानंतर पल्लवित झाल्या आणि त्यावर ७८ तासांतच विरजण पडले. मंगळवारी फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा, तर उपमुख्यमंत्रीपदाचा अजित पवार यांनी राजीनामा दिला. शनिवारी पुन्हा भाजप सरकार येण्याचा मार्ग मोकळा झाल्यामुळे मंत्रिमंडळाच्या यादीत आपले स्थान निश्चित झाल्याची खात्री तरी इच्छुकांना पटली होती; परंतु मंगळवारी सर्वांचेच स्वप्न भंगले. सोबत ज्यांच्या महामंडळावर नियुक्त्या झाल्या आहेत, त्यादेखील आता कायम राहतील, याबाबतही शंका निर्माण झाली आहे. 

महामंडळावरील अध्यक्ष, सभापतींना सरकार येण्याच्या शक्यतेने थोडा दिलासा मिळाला होता. जिल्ह्यात भाजपचे तीन आमदार निवडून आले आहेत. त्यामध्ये आ. हरिभाऊ बागडे, आ. अतुल सावे, आ. प्रशांत बंब यांचा समावेश आहे. जिल्ह्यात १० मंत्री आणि राज्यमंत्री दर्जांची सर्व पदे भाजपच्या वाट्याला मागच्या सरकारमध्ये आली होती. त्यामध्ये विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी उद्योग राज्यमंत्री अतुल सावे, म्हाडाचे सभापती संजय केणेकर, महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, बालहक्क आयोग अध्यक्ष प्रवीण घुगे, रोजगार हमी योजनेवर आ. प्रशांत बंब यांची शासनाने नियुक्ती केली होती. राष्ट्रपती राजवटीमुळे सर्व मंत्रिमंडळ बरखास्त झाले. मंत्रीपदाचा दर्जा असलेल्या मराठवाडा विकास मंडळावर डॉ. भागवत कराड, ग्राहक मंचावर अरुण देशपांडे, माहिती आयुक्त दिलीप धारूरकर, बसवराज मंगरुळे यांच्या नियुक्त्या नवीन सरकार स्थापनेनंतर राहतील की नाही, हे सांगता येत नाही. 

सरकार स्थापनेनंतर लगेच होणार निर्णय जिल्ह्यातील महामंडळे, समित्यांवर नियुक्त केलेल्या लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांना लोकसभा निवडणुकीपूर्वी व विधानसभा आचारसंहितेपूर्वी पदे देण्यात आली. यातील बहुतांश मंडळांवरील नियुक्त्या या पुढील आदेश येईपर्यंत आहेत. १ डिसेंबर रोजी ‘ठाकरे सरकार’चा शपथविधी झाला, तर सर्व महामंडळांवरील नियुक्त्यांबाबत पुढच्या आठ दिवसांत निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ४पुढील आदेश येईपर्यंत नियुक्त्यांचे पत्र ज्या मंडळांसाठी देण्यात आलेले आहे, त्यांची पदे गैरभाजप सरकार स्थापन झाल्यावर जाणार, हे मात्र निश्चित आहे. कारण तिन्ही पक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना महामंडळे वाटून सहभागी करून घ्यावे लागेल. 

टॅग्स :BJPभाजपाAurangabadऔरंगाबादChief Ministerमुख्यमंत्रीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस