शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

आहारात मीठ अन् मिठात आयोडीनचे प्रमाण जपावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 23:31 IST

दररोजच्या आहारात मिठाचे योग्य प्रमाण जपण्याची गरज आहे. कारण मिठातूनच शरीराला विशेषत: थायरॉईड ग्रंथीला आयोडीन मिळते. या ग्रंथीला पुरेसे आयोडीन मिळाले नाही, तर गलगंड, थकवा, उदासीनता, विसरभोळेपणा, केस गळणे, त्वचा कोरडी पडणे आदींना सामोरे जावे लागते.

ठळक मुद्देप्रीती फटाले : जागतिक थायरॉईड दिनानिमित्त संवाद

औरंगाबाद : दररोजच्या आहारात मिठाचे योग्य प्रमाण जपण्याची गरज आहे. कारण मिठातूनच शरीराला विशेषत: थायरॉईड ग्रंथीला आयोडीन मिळते. या ग्रंथीला पुरेसे आयोडीन मिळाले नाही, तर गलगंड, थकवा, उदासीनता, विसरभोळेपणा, केस गळणे, त्वचा कोरडी पडणे आदींना सामोरे जावे लागते. त्यामुळे मिठातील आयोडीनचे प्रमाण जपण्याची गरज असल्याचे बालस्थूलतातज्ज्ञ डॉ. प्रीती फटाले म्हणाल्या. जागतिक थायरॉईड दिनानिमित्त त्यांच्याशी साधलेला हा संवाद.थायरॉईड ग्रंथी म्हणजे काय आहे?प्रत्येकाच्या गळ्यात थायरॉईड ही फुलपाखरासारखी ग्रंथी असते. त्यातून प्रामुख्याने थायरॉक्सिन आणि ट्रायआय डोथारोनीन ही दोन संप्रेरके स्रवत असतात. ही संप्रेरके मेंदूतील पिट्युटरी ग्रंथीद्वारे स्रवली जातात. थायरॉईड संप्रेरक शरीराची वाढ, विकास, शरीराचे तापमान, चयापचय, ऊर्जेचे नियोजन, मासिक पाळी आणि स्नायूंची शक्ती नियंत्रित करतात. थायरॉईड ग्रंथीच्या कार्यासाठी आयोडीन हा आवश्यक घटक आहे.प्रश्न : थायरॉईड ग्रंथीचा विकार कोणाला होतो?उत्तर : डिसेंबर २०१८ मध्ये फार्मास्युटिकल एज्युकेशन आणि रिसर्च इंडियाद्वारे प्रसिद्ध केलेल्या लेखानुसार भारतीय लोकसंख्येच्या सरासरी ३२ टक्के लोक थायरॉईड ग्रंथीच्या वेगवेगळ्या विकारांनी म्हणजे गलगंड, हायपोथायरॉयडिजम््, हायपरथायरॉयडिजम्, थायरोडायटिस आणि थायरॉईड कर्करोगाने ग्रस्त आहेत. थायरॉईड ग्रंथीचा आजार मुली, स्त्रियांनाच नव्हे, तर पुरुष आणि मुलांनाही होऊ शकतो. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार याप्रमाणेच थायरॉईड ग्रंथीचे विकार घराघरांत पोहोचले आहेत. आहारात आयोडीनच्या अपुऱ्या प्रमाणामुळे विकार उद््भवतात.प्रश्न : आयोडीन कमी पडल्याने कोणता धोका संभवतो?गर्भधारणेदरम्यान मातेला आयोडीनचा पुरवठा कमी पडल्यास नवजात अर्भकात जन्मजात हायईपोथायरॉडिजम् हा विकार उद्भवू शकतो. बाळ दूध व्यवस्थितपणे न पिणे, जास्त झोपणे, कावीळ जास्त काळ राहणे आदी लक्षणे आहेत. नवजात अर्भकाची वाढ आणि विकास खुंटून मूल मतिमंद होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे गर्भावस्थेत मातेला पुरेसे आयोडीन मिळण्याची खात्री करणे गरजेचे असते.प्रश्न : मिठातील आयोडीनचे प्रमाण कसे जपावे?उत्तर : अन्न शिजविताना मिठाचा वापर न करता ताटात मीठ वाढले पाहिजे. मिठाचा पुडा फोडल्यानंतर एक महिन्यानंतर त्यातील मिठ वापरता कामा नये. ते इतर गोष्टींसाठी वापरावे. मीठ स्वयंपाकघरात, शेगडीजवळ, उन्हात ठेवू नये. ते कायम हवाबंद डब्यात ठेवावे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्य