शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

'कलेक्टर असो अथवा कोणी, काय करायचे ते करा'; भररस्त्यात जिल्हाधिकाऱ्यांना कारचालकाची अरेरावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 16:14 IST

'कारमध्ये जिल्हाधिकारी, आहेत रस्त्यावर भांडू नका' असे सांगूनही कारचालकाने ऐकले नाही

ठळक मुद्देआंबेडकर नगर चौकात जिल्हाधिकाऱ्यांच्या कारसमोर रिक्षा आणि कार चालक आपसात हाणामारी करीत होते.जिल्हाधिकाऱ्यांनी कारमधून उतरून कार चालकाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

औरंगाबाद : रस्त्यावर भांडण करून वाहतूकीला अडथळा आणू नका असे सांगणाऱ्या  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि त्यांच्या अंगरक्षकाला एका कारचालकाने अरेरावीची भाषा वापरली. एवढेच नव्हे तर अंगरक्षक पोलिसाला धक्काबुक्की केल्याची खळबळजनक घटना २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९:२० वाजेच्या सुमारास जळगांव रोडवरील आंबेडकरनगर चौकात घडली. याप्रकरणी गुन्हा नोंदवून सिडको  पोलिसांनी आरोपीला अटक केली.

शशांक अशोक वाघ असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की रविवारी सकाळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण हे कलाग्राम येथे मतपेट्याची पाहणी करून कारने  कार्यालयाकडे परत जात होते. यावेळी त्यांचा अंगरक्षक पोलीस कॉन्स्टेबल रामेश्वर गणपती इंगळे त्यांच्यासोबत होते. आंबेडकर नगर चौकात त्यांच्या कारसमोर रिक्षा आणि कार रस्त्यात उभी होती. दोन्ही वाहनाचे चालक आपसात हाणामारी करीत होते. यामुळे चालकाने कार उभी केली आणि अंगरक्षक इंगळे हे भांडण सोडवण्यासाठी गेले.

'कारमध्ये जिल्हाधिकारी, आहेत रस्त्यावर भांडू नका', असे त्यांनी दोघांना सांगितले असता रिक्षाचालक तिथून निघून गेला. तर कारचालक शशांक हा इंगळे त्यांच्यासोबत हुज्जत घालू लागला. एवढेच नव्हे तर त्याने इंगळे यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. हे पाहून जिल्हाधिकारी कारमधून उतरले आणि त्यांनी कार चालक शशांकला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने, 'तुम्ही कलेक्टर असो अथवा कोणी, तुम्हाला काय करायचे करून घ्या?' असे उर्मट बोलून तो कार घेऊन तेथून निघून गेला. या घटनेनंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने अंगरक्षक इंगळे यांनी सिडको पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.

पोलिसांनी केली रात्री अटकआरोपी शशांक हा आरटीओ अधिकार्‍याचा तरुण मुलगा आहे. तो उस्मानपुरा परिसरात व्यायाम शाळा चालवितो. त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल होताच सिडको ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी आणि अन्य अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तात्काळ आरोपीला त्याच्या घरातून अटक केली. आज त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद