शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

काळजी घ्या, नाही तर हाडे होतील ठिसूळ; चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव ठरतोय कारणीभूत 

By संतोष हिरेमठ | Updated: October 21, 2023 19:11 IST

जागतिक ऑस्टियोपोरोसिस दिन : हाडे ठिसूळ होण्याचे प्रमाण महिलांमध्ये अधिक

छत्रपती संभाजीनगर : दरवर्षी २० ऑक्टोबर रोजी 'जागतिक ऑस्टियोपोरोसिस दिन' साजरा केला जातो. ऑस्टियोपोरोसिस म्हणजे हाडांची ठिसुळता. महिलांमध्ये याचे प्रमाण पुरुषांपेक्षा ५ ते ६ पटीने अधिक आढळते. उतारवयात कमरेत वा पाठीच्या मणक्यात येणारा बाक, उतारवयात मांडीचे वा पायाचे हाड मोडणे यासाठी हाडांची ठिसुळता कारणीभूत असते. चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, सूर्यप्रकाशात न जाणे अनेक बाबी हाडे ठिसूळ करण्यासाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे याकडे वेळीच लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे अस्थिव्यंगोपचारतज्ज्ञांनी म्हटले.

व्यायाम, सकस आहार महत्त्वाचासामान्यतः वयाच्या चाळिशीनंतर हाडांची ठिसुळता पहायला मिळते. हार्मोनल बदलांमुळे स्त्रियांमध्ये अधिक प्रमाण आहे. ऑस्टियोपोरोटिक व्यक्तींना फ्रॅक्चर होण्याची अधिक शक्यता असते. परंतु सकस आहारामुळे त्यास प्रतिबंध होतो. त्यासाठी कॅल्शियम आणि ‘व्हिटॅमिन डी’युक्त पूरक आहार घ्यावा. नियमित व्यायाम करावा.- डाॅ. एम. बी. लिंगायत, अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागप्रमुख, घाटी

आपोआप फ्रॅक्चर होतेवयाच्या ४५ वर्षांनंतर हाडाचे घनत्व कमी होण्यास सुरुवात होते. हाडे ठिसूळ होऊन ६० वर्षे वयापर्यंत मान, पाठ , कंबर दुखणे, मणक्यात आपोआप फ्रॅक्चर होणे किंवा बाक पडत जाणे, हे लक्षणे प्रामुख्याने दिसतात. यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शियम, व्हिटॅमिन डी-३ , सोबत हॉर्मोनल थेरपीदेखील घेण्याची गरज लागू शकते. हाडे ठिसूळ होऊ नये, म्हणून नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे.- डॉ. चंद्रशेखर गायके, अस्थिरोगतज्ज्ञ

फास्टफूड नकोचआजकाल फास्टफूड संस्कृतीमुळे हाडांची ठिसुळता ही खूप सामान्य आहे. बैठी जीवनशैली, मोबाइल आणि संगणकाचा अतिवापर टाळला पाहिजे. सकस आहार, निरोगी जीवनशैली , योगासने हे हाडांची ठिसुळता टाळण्यासाठी फायदेशीर ठरते.- डाॅ. मुक्तदीर अन्सारी, अस्थिव्यंगोपचारतज्ज्ञ, घाटी

‘ऑस्टियोपोरोसिस’ची लक्षणे-सतत मान, पाठ-, कंबर दुखणे- पाय दुखणे- पाठीत बाक येणे- गुडघे दुखणे- उंची कमी होणे- मांडीचे, हाताचे हाड मोडणे

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्य