शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सावधान..! पशुधनालाही उष्माघाताचा धोका, वाढत्या उन्हामुळे जनावरे होतात अस्वस्थ

By विजय सरवदे | Updated: April 25, 2024 15:46 IST

काळजी घेण्याचा सल्ला, जनावरांच्या शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी पशुपालकांनी काळजी घेतली पाहिजे.

छत्रपती संभाजीनगर : अलीकडे उन्हाचा पारा सतत वर सरकत आहे. उन्हाच्या काहिलीने जनावरेही अस्वस्थ होत आहेत. वाढत्या तापमानामुळे केवळ मनुष्यांना उष्माघाताचा धोका आहे असे नव्हे, तर जनावरांनाही उष्माघाताचा फटका बसू शकतो. त्यामुळे उन्हापासून जनावरांचे संरक्षण करावे, असे आवाहन जि. प. पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

जिल्ह्यात लहान-मोठे मिळून साडेपाच लाखांहून अधिक जनावरे आहेत. उन्हाच्या झळांनी पशुधनालाही‎ धोका निर्माण होतो. त्यामुळे‎ पशुपालकांनी काळजी घ्यावी. वाढत्या उष्म्याने त्यांचे शारीरिक तापमान (१०३ ते ११० ‎अंश फॅरानहाइट) वाढते. त्यांची ‎तापमान नियंत्रण करण्याची क्षमता कमी पडल्यास‎ शारीरिक तापमानात वाढ होते. त्यामुळे एका जागी उभे राहणे, बैचेन होणे, सतत उठ-बस करणे, भूक मंदावणे, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे. लहान-मोठ्या आजारांना बळी पडणे आणि दूध उत्पादनात मोठी घट होणे, अशी जनावरांमध्ये लक्षणे दिसून येतात.

गेल्या काही दिवसांपासून तापमानाने चाळिशी ओलांडली आहे. त्यामुळे जनावरांच्या शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी पशुपालकांनी काळजी घेतली पाहिजे. जनावरांना ऐन दुपारच्या वेळेत मोकळे सोडणे किंवा त्यांना बांधलेल्या ठिकाणी उन्हाचा त्रास जाणवणार नाही, याची काळजी घ्यावी. त्यांना सावलीत किंवा मोकळ्या हवेशीर जागेत बांधावे. उष्माघाताचा त्रास जाणवल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुरेखा माने यांनी केले आहे.

पिण्यासाठी २४ तास पाणी द्यासकाळी १० ते दुपारी ५ वाजेपर्यंत शक्यतो जनावरांना चरण्यासाठीही बाहेर सोडू नये. त्यांना थंड सावली असलेल्या ठिकाणीच बांधावे, त्यांच्या अंगावरती किमान दिवसातून दोन ते तीन वेळा पाणी टाकावे. तसेच त्यांना पिण्यासाठी २४ तास जास्त प्रमाणात पाणी उपलब्ध करून द्यावे, जेणे करून ते आपल्या शरीरातील तापमान संतुलित ठेवू शकतील. बैलांकडून‎ शेतीच्या मशागतीची कामे शक्यतो‎ सकाळी व संध्याकाळी कमी उन्हात‎ करून घ्यावीत.- डॉ. सुरेखा माने, पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद

टॅग्स :Heat Strokeउष्माघातAurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्र