शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सावध रहा, भेसळ केलेले पनीर कसे ओळखाल?

By साहेबराव हिवराळे | Updated: August 18, 2023 20:35 IST

पनीरसारख्या दुग्धजन्य पदार्थांची योग्य तापमानात साठवणूक करावी, तसेच काही अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत काही संशय आल्यास प्रशासनाकडे संपर्क साधावा.

छत्रपती संभाजीनगर : सणासुदीच्या काळात पनीर, चक्का दही, खवा यासारख्या दुग्धजन्य पदार्थांची बाजारपेठेत ग्राहकांकडून मागणी वाढते. मागणी वाढल्याने अशा अन्नपदार्थांचा तुटवडा होऊ शकतो. अशा वेळी कमी दर्जाचे अथवा भेसळयुक्त पदार्थ विक्री होऊ शकतात. ग्राहकांनी सजग राहून दुग्धजन्य पदार्थांची खरेदी करणे आवश्यक असते. पनीर नैसर्गिक पद्धतीने दुधापासून बनवितात; परंतु काही जण त्यामध्ये खाद्यतेल, युरिया पावडर यासारखे पदार्थ वापरून कमी दर्जाचे पनीर बनवून विक्री करतात.

या पद्धतीने ओरिजनल आणि नकली पनीर ओळखू शकतासर्वप्रथम पनीर घेताना पनीरचा तुकडा क्रश करावा लागेल. जर पनीर रगडल्याने फुटू लागले तर ते नकली आहे हे लक्षात आले पाहिजे.

सातत्याने विभागातील कर्मचारी तपासणी करतात..ओरिजनल पनीरचा दुधासारखा वास येतो, तर नकली पनीरला वास नसतो किंवा आंबट वास येतो. त्यात काही तफावत आढळून आल्यास दंडात्मक कारवाईही होते.

पनीरमधील भेसळ कशी ओळखाल?बनावट पनीरमध्ये स्किम्ड मिल्क पावडर घातलेली असते. त्यामुळे अशा पनीरला जास्त दबाव पेलता येत नाही आणि त्याचे बारीक तुकडे होत जातात. अस्सल पनीरचा तुकडा दाबल्यानंतर रबरासारखा दाबला जातो, त्याचे बारीक बारीक तुकडे होत नाहीत.

काय होणार कारवाई?अन्न व औषधी प्रशासनातर्फे सणासुदीच्या काळात दूध व दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन व विक्री करणाऱ्या दुकानांची विशेष तपासणी करण्यात येते. संशय आढळून आल्यास अन्नपदार्थांचे नमुने घेण्यात येतात. विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. विश्लेषण अहवालानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येते. न्यायालयात दोषींवर खटला दाखल करण्यात येतो.

संशय आल्यास प्रशासनाकडे संपर्क साधावा...पनीरसारख्या दुग्धजन्य पदार्थांची योग्य तापमानात साठवणूक करावी, तसेच काही अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत काही संशय आल्यास प्रशासनाकडे संपर्क साधावा. परवानाधारक अथवा नोंदणीकृत अन्न व्यावसायिकांकडूनच अन्नपदार्थांची खरेदी करावी.- निखिल कुलकर्णी, अन्न सुरक्षा अधिकारी

टॅग्स :foodअन्नAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी