शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

काळजी घ्या! छत्रपती संभाजीनगरात सर्दी-खोकला, तापाचे सर्वाधिक रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 19:44 IST

मनपाच्या ४० आरोग्य केंद्रांवर दररोज २ हजार रुग्ण

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या ४० आरोग्य केंद्रांवर दररोज दोन हजारांहून अधिक रुग्ण येत आहेत. यामध्ये सर्वाधिक रुग्ण सर्दी-खोकला आणि तापाचे आहेत. काही आरोग्य केंद्रांवर सकाळी लांबलचक रांगा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एका महिन्यात सर्व आरोग्य केंद्रांवर येणाऱ्या रुग्णांची संख्या जवळपास ३० हजारांपर्यंत जात आहे.

शहरात महापालिकेचे पाच रुग्णालये, ४० आरोग्य केंद्र आहेत. प्रत्येक आरोग्य केंद्रात मुबलक प्रमाणात औषधी उपलब्ध करून दिली जात आहेत. येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला बहुतांश औषधी आरोग्य केंद्रातच देण्यात येतात. त्यामुळे रुग्ण संख्या वाढत असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी अर्चाना राणे यांनी सांगितले. ४० आरोग्य केंद्रात १४ ऑगस्ट रोजी २ हजार १८६ रुग्णांची नोंद झाली.

सर्वाधिक रुग्ण एन- ७ येथील आरोग्य केंद्रातसर्वाधिक ओपीडी सिडको एन- ७ येथील आरोग्य केंद्रात होती. या ठिकाणी १७७ रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्या खालोखाल १६० रुग्णांची तपासणी सिडको एन-११ येथील आरोग्य केंद्रात झाली. बायजीपुरा येथील आरोग्य केंद्रात १३६ रुग्णांची तर सादातनगर आरोग्य केंद्रात १०५ रुग्णांची ओपीडी झाल्याची नोंद आहे. जुलै महिन्यात सर्व आरोग्य केंद्रात मिळून २९ हजार ५२१ रुग्णांची तपासणी करण्यात आली. बहुतेक रुग्ण सर्दी, खोकला, ताप या आजाराचे होते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका