शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र पोलिसांच्या गणवेशात बेस बॉल टोपीची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 18:53 IST

बेस बॉल टोपी घातली तरी पारंपरिक टोपीसुद्धा सोबत बाळगावी लागणार आहे. 

औरंगाबाद : महाराष्ट्रपोलिसांच्या गणवेशात बेस बॉल नावाच्या एका अतिरिक्त टोपीची भर पडली आहे. याबाबतचे परिपत्रक पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी जारी केले आहे.

महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षकपर्यंतच्या कर्मचाऱ्यांच्या गणवेशाचा भाग म्हणून फटिंग टोपी वापरतात. मात्र, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळताना धावपळीत पोलिसांच्या डोक्यावरील टोपी पडण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन ही अतिरिक्त टोपी देण्यात आली आहे. बेस बॉल टोपीमुळे ऊन, पाऊस यापासून संरक्षण होते. शिवाय ती डोक्यात घट्ट बसत असल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या प्रसंगी डोक्यावरून पडत नाही. पारंपरिक टोपीसोबतच पोलीस शिपाई ते सहायक उपनिरीक्षकपदावरील कर्मचाऱ्यांसाठी काळ्या रंगाची बेस बॉल टोपी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

यासंबंधीचा आदेश परिपत्रकात राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांना देण्यात आला आहे. आपल्या स्तरावर अशा विहित नमुन्यातील टोप्या बनवून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. असे असले तरी पारंपरिक टोपी ठेवून दैनंदिन वापरासाठी बेस बॉल टोपी परिधान करण्याच्या सूचना  देण्यात आल्या आहे. यामुळे बेस बॉल टोपी घातली तरी पारंपरिक टोपीसुद्धा सोबत बाळगावी लागणार आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसAurangabadऔरंगाबादMaharashtraमहाराष्ट्र