माजलगाव : येथील भारतीय स्टेट बँक शाखा फोडण्याचा चोरांचा डाव शनिवारी मध्यरात्री नागरिकांच्या सतर्कतेमुळे अयशस्वी झाला. नागरिक व चोरटे यांच्यात दगडफेक झाली. पोलिसांनी अफवा समजून घटनास्थळी येण्यास विलंब केला. तोवर चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. स्टेट बँक आॅफ इंडियाची येथील नवीन नगर परिषदेच्या कार्यालयासमोर शाखा आहे. रात्री साडेअकरा वाजाता मागील भिंतीवरुन चोरटे बँकेच्या छतावर गेले. ते बँकेत प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न करता असल्याचे काही नागरिकांनी पाहिले. त्यानंतर नागरिकांची गर्दी वाढली. पोलिसांनाही याची माहिती दिली; परंतु पोलीस वेळेत पोहोचले नाही. यावेळी नागरिकांनी चोरांना पिटाळून लावण्यासाठी बॅँकेच्या छतावर दगडांचा वर्षाव केला. चोरांनी दगड चुकवून बचाव केला. छतावर पडलेले दगड उचलून चोरांनी नागरिकांच्या दिशेने भिरकावण्यास सुरुवात केली. जवळपास पंधरा मिनिटे ही धूमश्चक्री सुरु होती. दरम्यान, गर्दी पांगल्यावर चोर पळून जाण्यात यशस्वी झाले.तासाभरानंतर शहर ठाण्याचे निरीक्षक एच. एम. मानकर फौजफाट्यासह तेथे पोहोचले. तोपर्यंत चोर पसार झाले. याप्रकरणी गुन्हा नोंद झाला नाही. (वार्ताहर)
बँक फोडण्यांचा प्रयत्न अयशस्वी
By admin | Updated: February 5, 2017 23:25 IST