शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठातील संशोधकांना पेटंट मिळताहेत पण त्याचे पुढे काय होते?

By राम शिनगारे | Updated: March 6, 2024 18:26 IST

पेटंटचा उपयोग व्यवसाय, उद्योगांसाठी होत नसल्याचे सत्य समोर

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संशोधक प्राध्यापकांना मागील पाच वर्षांच्या कालावधीमध्ये तब्बल २५ पेक्षा अधिक पेटंट मिळाली असून, १५ प्रकाशित झाली आहेत. त्याशिवाय पेटंट मिळविणाऱ्यांमध्ये संलग्न महाविद्यालयातील संशोधक प्राध्यापकांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. पेटंट मिळाल्यानंतर त्याचे काय होते? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो. त्याचा शोध घेतला असता, मिळविलेल्या पेटंटचा वापर पुढील संशोधनासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, संबंधित प्राध्यापकांना त्याचे व्यवसाय, उद्योग उभारणीसाठी संधीच उपलब्ध होत नसल्याचे 'लोकमत'च्या पाहणीत आढळून आले आहे.

विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात मागील पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात संशोधक प्राध्यापकांना भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून दाखल संशोधनास स्वामित्व हक्क (पेटंट) देण्यात आले आहेत. हे स्वामित्व हक्क दिल्यानंतर संबंधित संशोधनावर संपूर्णपणे हक्क संशाेधकांचा राहतो. संबंधित संशोधनाचा उपयोग समाज, उत्पादनाच्या निर्मितीसाठी झाला पाहिजे, त्यासाठी प्रत्येक संशोधकांचे प्रयत्न असतात. मात्र, संशोधकांना पेटंट मिळाल्यानंतर त्याचे व्यावसायिकरण करण्यासाठी वेगवेगळे उद्योग, कंपन्यांचे सहकार्य आवश्यक आहे. मुंबई-पुण्यातील संशाेधकांना उद्योगांकडून मागण्या मोठ्या प्रमाणात असतात. त्या तुलनेत छत्रपती संभाजीनगरात व्यवसाय उद्योगाच्या उभारणीसाठी संधीच नाहीत, असे संशोधक प्राध्यापकांनी ''''लोकमत''''शी सांगितले.

संशोधकांचा वाढतो बायोडाटापेटंट मिळाल्यानंतर त्याचा उपयोग व्यवसाय, उद्योग उभारणीसाठी झाला नाही तरी संशोधक प्राध्यापकांचा बायोडाटा मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचा उपयोगही संशोधकांच्या वैयक्तिक प्रगतीसाठी, वेगवेगळ्या संधी मिळण्यामध्ये होत असल्याचेही आढळून आले आहे.

व्यवसाय किंवा उद्योगासाठी कुलगुरूंचे प्रयत्नब्रिद्री हस्तकलेच्या वस्तूंसाठी लागणाऱ्या बिदर किल्ल्यातील मातीला विद्यापीठातील तीन संशोधक प्राध्यापकांनी पर्याय शोधला आहे. त्यात डॉ. भास्कर साठे, डॉ. अभिजित शेळके आणि डॉ. कृष्णप्रिया रोला यांचा समावेश आहे. या संशोधनाला नुकतेच पेटंट जाहीर झाले. या पेटंटच्या प्राप्तीनंतर त्यावर उद्योग उभारणी किंवा व्यवसाय प्रारंभ व्हावा यासाठी कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनात संशोधक वस्तू बनविणाऱ्या व्यवसायिकांची कार्यशाळा घेणार आहे. त्यातून ब्रिदी कलेविषयीचे स्टार्टअप सुरू करण्यासाठी संशोधक मार्गदर्शन केले जाणार आहे.

स्टार्टअप सुरू करण्यास प्राधान्यविद्यापीठातील संशोधक प्राध्यापकांना पेटंट मिळण्याचे प्रमाण वाढले आहे. या पेटंटचा उपयोग व्यवसाय उभारणीसाठी उद्योग उभारणीसाठी विद्यापीठ प्रशासन संबंधितांना सर्वतोपरी सहकार्य करेल. सध्या विद्यापीठाच्या इन्क्युबेशन केंद्रात ६८ कोटी रुपयांचे स्टार्टअप सुरू आहेत. पेटंट मिळविलेल्या विषयांवरही स्टार्टअप सुरू करण्यासाठी आगामी काळात प्राधान्य असणार आहे.- डॉ. विजय फुलारी, कुलगुरू

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षण