शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

'टॉप फाइव्ह' मुलाखतीनंतर कुलगुरूंची घोषणा होईना; दोघांची रस्सीखेच, तिसराच बाजी मारणार?

By राम शिनगारे | Updated: January 11, 2024 20:08 IST

विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंच्या निवडीसाठी सहा महिन्यांपूर्वी प्रक्रियेला सुरुवात झाली होती.

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी ४ जानेवारी रोजी 'टॉप फाइव्ह'च्या मुलाखती पार पडल्या आहेत. या मुलाखतींना सात दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी अद्याप त्यातील एका जणाची कुलगुरूपदासाठी निवड झालेली नाही. दरम्यान, आणखी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती राजभवनातील सूत्रांनी दिली.

विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंच्या निवडीसाठी सहा महिन्यांपूर्वी प्रक्रियेला सुरुवात झाली होती. डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखालील शोध समितीने २८ नोव्हेंबर २०२३ रोजी २४ जणांना मुलाखतीसाठी मुंबईत बोलावले होते. त्याच दिवशी सायंकाळी 'टॉप फाइव्ह'च्या नावाची यादी बंद लिफाफ्यात राज्यपाल तथा कुलपती यांच्या कार्यालयाकडे सोपविण्यात आली होती. त्यावर कुलपती कार्यालयाने 'टॉप फाइव्ह'मध्ये असलेल्या कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील डॉ. विजय फुलारी, डॉ. ज्योती जाधव, पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. विलास खरात, डॉ. संजय ढोले आणि नागपूर येथील डॉ. राजेंद्र काकडे यांच्या नावाचा समावेश होता.

या पाच जणांना १९ डिसेंबर २०२३ रोजी मुलाखतींसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, एकदिवस अगोदर सदरील मुलाखती पुढे ढकलण्यात आल्याचे आदेश आले. त्यानंतर पाच जणांच्या मुलाखती ४ जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजेनंतर राजभवनात घेण्यात आल्या. प्रत्येक उमेदवारास ८ ते १० मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. त्याच दिवशी सायंकाळी नावाची घोषणा होण्याची शक्यता होती. मात्र, कुलगुरूपदाच्या नावाची घोषणा पाच दिवसांनंतरही झालेली नाही. संपूर्ण प्रक्रिया पार पडलेली असताना घोषणा होण्यास कशामुळे उशीर होत आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे, तसेच त्याविषयी उच्चशिक्षण क्षेत्रात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

दोघांची रस्सीखेच, तिसराच बाजी मारण्याची शक्यताकोल्हापूरचे डॉ. विजय फुलारी यांच्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट प्रयत्न करीत आहे. त्याशिवाय भाजपच्या संबंधित एका गटाचेही त्यांना समर्थन आहे. त्याचवेळी भाजपच्या माध्यमातून राजकारण करीत असलेले विद्यापीठ विकास मंचने पुण्यातील डॉ. संजय ढोले यांच्या नावासाठी आग्रह धरल्याचे समजते. या दोघांच्या ओढाताणीमध्ये 'नागपूरकर' असलेले डॉ. राजेंद्र काकडे बाजी मारून जातील, अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण